लोहा नगर परिषदेचा ५ लाख ७६ हजार रुपये शिल्लकीचा अर्थ संकल्प मंजूर

लोहा/श.प्र.शिवराज दाढेल लोहेकर

     लोहा,जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बहुचर्चित असलेल्या लोहा नगर परिषदेचा ५ लाख ७६ हजार रुपये शिल्लकीचा अर्थ संकल्प मंजूर करण्यात आला आहे.लोहा नगर परिषदेचे अध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली लोहा नगर परिषदेची २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थ संकल्पा बाबत विशेष सभा संपन्न झाली.

महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम १०१ तसेच महाराष्ट्र लेखा संहिता २०१३ चे नियम ४०५,४०६,४११ प्रमाणे लोहा नगर परिषदेचे आगामी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थ संकल्पा करीता अंदाज पत्रक तयार करण्यात आले असून यात पंतप्रधान आवास योजना,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना,स्वच्छ महाराष्ट्र या व इतर योजनांसाठी अंदाज पत्रकात जमा व खर्चाच्या बाजुस नियमानुसार आवश्यक त्या व पुरेशा तरतुदी ठेवण्यात आल्या आहेत.

अंदाजे प्रारंभिक शिल्लक ०१/०४/२०२१.१७ लक्ष,अंदाजे उत्पन्न ७२ कोटी ३७ लाख ७८ हजार २९१ रुपये, एकुण ७२ कोटी ४९ लाख २ हजार २९१ रुपये,अंदाजे अखेरची शिल्लक दि. ३१/०३/२०२२. ५ लाख ७६ हजार रुपये अशा प्रकारे लोहा न.पा.च्या अर्थ संकल्पाला सभागृहानी मान्यता दिली.
यावेळी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपाध्यक्ष शरद पवार,मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, लेखापाल बजरंग अहिलाजी जगताप,एस केंद्रे,यांच्या सह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *