अँटिलिया स्फोटकं प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझेंच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. सचिन वाझेंना ३ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात आहेत. वाझे यांना १३ मार्चला अटक करण्यात आली. त्यांची कोठडी काल संपली असल्यानं त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. वाझेंकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं घ्यायची असल्यानं चौकशी करण्यास वेळ हवा, असं एनआयएच्या वकिलांनी न्यायमूर्तींनी सांगितलं. यानंतर वाझेंच्या कोठडीत १० दिवसांनी वाढ करण्यात आली.
एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात अतिशय धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझेंच्या घरात ६२ जिवंत काडतुसं सापडली आहेत. इतकी काडतुसं घरात का ठेवली होती, असा प्रश्न वाझेंना विचारण्यात आला. मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. सचिन वाझे पोलीस अधिकारी होते. त्यांनी विभागातून ३० जिवंत काडतुसं मिळाली होती. मात्र यापैकी केवळ पाचच गोळ्या वाझेंकडे मिळाल्या. उरलेली काडतुसं कुठे आहेत, याचंही समाधानकारक उत्तर वाझेंना देता आलेलं नाही, असं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.
पोलीस विभागातून घेतलेल्या ३० पैकी २५ काडतुसांचं काय झालं, त्यांचा वापर कुठे आणि कशासाठी केला, अशी प्रश्नांची सरबत्ती एनआयएनं केली. मात्र यातल्या एकाही प्रश्नाचं व्यवस्थित उत्तरं देणं वाझेंना जमलेलं नाही. त्यांनी अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत. त्यामुळेच त्यांची कोठडी वाढवण्यात यावी, अशी मागणी एनआयएनं न्यायालयाकडे केली.
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. मला बळीचा बकरा केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. मी समाजाविरोधात कट केलेला नाही. तसं असल्यास एनआयएनं ते सिद्ध करावं. मी एनआयएला तपासात, चौकशीत पूर्ण सहकार्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा कोठडी देऊ नका, अशी विनंती वाझेंनी न्यायमूर्तींकडे केली.
मला बळीचा बकरा बनवला जात आहे” असा आरोप आज सचिन वाझे यांनी विशेष एनआयए कोर्टात केला. एनआयए अधिकाऱ्यांकडून माझी पुरेशी चौकशी झाली आहे. त्यामुळे आणखी कोठडी वाढवून देण्यात येऊ नये, अशी विनंतीही वाझे यांच्यातर्फे कोर्टात करण्यात आली. मात्र, वाझे यांची ही विनंती अमान्य करत त्यांची एनआयए कोठडी ३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
‘मी अँटिलिया प्रकरणात केवळ दीड दिवस तपास अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर तुझ्याविरोधात पुरावे आहेत आणि तुला अटक करण्यात येत आहे, असे मला अचानक सांगण्यात आले’, असा दावाही वाझे यांनी आज कोर्टात केला. मी एनआयए समोर कोणत्याही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही, असेही वाझे यांनी पुढे कोर्टात नमूद केले.
सचिन वाझे यांच्या म्हणण्यावर एनआयएकडून आक्षेप घेण्यात आला. एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टात म्हणणे मांडले व प्रकरण किती गंभीर आहे याकडे लक्ष वेधले. “अगली बार यह सब सामान कनेक्ट होके आएगा, समझ जा… तुझे और तेरी पुरी फॅमिली को उडाने का बंदोबस्त कर दिया है”, अशा स्वरूपाच्या धमकीची दोन पत्रे सदर स्कॉर्पिओमध्ये होती. त्यामुळे आरोप गंभीर आहेत, असे सिंग यांनी नमूद केले. एनआयएकडून सचिन वाझे यांच्या १५ दिवसांच्या कोठडीची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर कोर्टाने वाझे यांना ३ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर एका स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई क्राइम ब्रांचमार्फत करण्यात येत होता. क्राइम ब्रांचच्या सीआययू युनिटचे सचिन वाझे हे हा तपास हाताळत होते. मात्र, स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. त्याचे विधीमंडळात पडसाद उमटलेच शिवाय हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यानंतर एनआयएच्या तपासात संशयाची सुई सचिन वाझे यांच्याकडे वळली आणि मॅरेथॉन चौकशीनंतर वाझे यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आलेली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणानंतर त्याच ठिकाणी मंगळवारी बेवारस दुचाकी सापडल्याने खळबळ उडाली. गावदेवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. या दुचाकीचा स्कॉर्पिओ प्रकरणाशी काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे.
२५ फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या स्काॅर्पिओबाबत तपास सुरू असतानाच स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा, एटीएस अधिक तपास करीत असताना, मंगळवारी दुपारी मलबार हिल येथील वाहतूक पोलिसांच्या नजरेत राखाडी रंगाची सुझुकी एक्सेस (एमएच ०१ डीडी २२२५) दुचाकी सापडली. स्कॉर्पिओ पार्क केलेल्या ठिकाणीच ही दुचाकी पार्क केली होती. स्कॉर्पिओ प्रकरणानंतर अधिक सतर्क झालेल्या पोलिसांनी याबाबत गावदेवी पोलिसांना कळविले.
घटनेची वर्दी मिळताच गावदेवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुचाकी क्रमांकावरून त्याच्या मालकाची माहिती सापडू शकलेली नाही. पोलिसांच्या वाहन ॲपमध्ये या क्रमांकाची कुठलीही नोंद नाही. पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला दुचाकीचा नोंदणी क्रमांक, इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक देऊन मालकाचे तपशील देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.
ही दुचाकी चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, त्याचे स्कॉर्पिओ आणि मनसुख प्रकरणाशी काही संबंध आहे का? या दिशेनेही पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या मदतीने ही दुचाकी कोणी व कधी पार्क केली? याबाबतही पथक अधिक तपास करीत आहे.
ही दुचाकी चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, त्याचे स्कॉर्पिओ आणि मनसुख प्रकरणाशी काही संबंध आहे का? या दिशेनेही पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या मदतीने ही दुचाकी कोणी व कधी पार्क केली? याबाबतही पथक अधिक तपास करीत आहे. या दुचाकीचा क्रमांक बनावट असल्याचा संशयही पोलिसांना आहे. प्रादेशिक विभागाच्या मदतीने या दुचाकीबाबत अधिक माहिती मिळविण्यात येत आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
२६.०३.२१