कंधार ; प्रतिनिधी
भारतीय सैन्य दलातील बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (बी एस एफ ) मधे प्रियदर्शनी मुलींचे विद्यालय कंधार येथील विध्यार्थिनी कु.पूजा कीवंदे या मुलीची नुकतीच निवड झाली असून आज दि.२६ मार्च रोजी कंधार येथे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर परीवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कु.पूजा कीवंदे ही प्रियदर्शनी मुलींचे विद्यालय कंधार येथील विध्यार्थिनी आहे.या यशाबद्दल माजी आमदार इश्वरराव भोसीकर परीवाराच्या वतीने
जिल्हा कॉग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर, सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जि. प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बालाजीराव कीवंदे यांची उपस्थिती होती.