कोरोना महासंकटात मोबाईल वरुन संस्थेच्या परिवारातील सदस्यांना दिला, अध्यक्ष डाॅ.पुरुषोत्तमराव धोंडगे यांनी दिला धीर..!


क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ; दत्तात्रय एमेकर


श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेच्या परिवारातील सर्व सहकारी बंधु-भगीनींना संस्थापक व संचालक, माजी खासदार व आमदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,विद्रोही विचारवंत आदरणीय डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब व संस्थेचे,माजी जि.प.सदस्य, संस्था अध्यक्ष मा.प्रा.डॉ.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी संस्थेतील आपल्या सहकारी,मित्रमंडळींना स्वतः जातीने मोबाईल वरुन कोरोना महामारीत स्वतःची व परिवाराची काळजी घ्या, तुम्हाला कांही अडचण असेल तर फोन करा असे सर्वांना स्नेहभावनेतून फोन केला. काळजी करू नका धीराचा शब्द प्रत्येक संस्थेतील सदस्यांना बळ देतो आहे.

आपण प्रशासनाच्या नियमाचे पालन करा असे आवाहन केले आहे.हा धीर देण्यासाठी केलेला मोबाईल वरुन हिंमत देवून काळजी घेणारी संस्था ही पहिलीच असेल.

सध्याच्या कोरोना महासंकटात भयभीत अवस्थेत आम्हाला अत्यंत कळकळीने धीर दिल्याबद्दल भाईं साहेब व भाऊसाहेब यांचे मनःपूर्वक आभार.

मानाची कोटी-कोटी जयक्रांति!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *