कंधारचे तहसिलदार मुंडे यांची शिराढोण येथिल ५ किराणा दुकानावर कार्यवाही ; लॉकडाऊनचे नियण मोडल्याने वसुल केला दंड

कंधार ;प्रतिनिधी

नांदेड जिल्हात दि.२५ मार्च पासून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे.कंधार तालुक्यात व शहरात यांची अमल बजावणी तंतोतंत व्हावी व कोरोना प्रादूर्भाव कमी व्हावा म्हणून कंधार चे तहसिलदार व्यंकटेश मुंडे,कंधार नगरपालीकेचे मुख्याधिकारी विजय चव्हाण व पोलीस प्रशासन सर्व जनतेस आवाहन करत आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज दि.२७ मार्च रोजी शिरोढोण येथे पथकाने भेट दिली असता ५ दुकान दाराकडून लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन केल्याने सुमारे २ हजार पाचशेचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहीती तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.

दि.२७ मार्च रोजी तहसीलदार व्यंकटेश मुंडे व नायब तहसीलदार तथा कंधार नगरपालीकेचे मुख्याधिकारी विजय चव्हाण, उस्माननगर चे पोलीस उपनिरिक्षक जमदाडे यांनी शिराढोन ग्राम पंचायत उपकेंद्र वरील लसीकरण केंद्रावर भेट देवून लसीकरण विभागाची पाहणी केली .सकाळ पासुन ६० व्यक्ती नि लस घेतली होती. तसेच
दुपारी गावातील दुकान उघडे ठेवल्या मुळे ५ किराणा दुकानाना सुमारे २ हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला.

यावेळी उस्माननगर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सांवत एस. एम., शिराढोण चे सरपंच खुशालराव पांडागळे, सदस्य प्रकाश चौडम, साईनाथ कपाळे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *