होते पांडे म्हणून वाचले पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे

नांदेडमध्ये शीख समुदायाकडून काढण्यात आलेल्या जंगी मिरवणूकीला पोलीसांनी रोखले असता शीख भाविक भक्तांनी पोलीसांवरच हल्ला चढवला. यात चार पोलिस जखमी झाले असून पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यावरील वार अंगरक्षक पांडे यांनी अंगावर घेत होते पांडे म्हणून वाचले शेवाळे ही उक्ती खरी करुन दाखविली. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 60 जण हे आरोपी असल्याचे निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात 60 जण आरोपी असल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अद्यापही पोलिसांकडून आरोपींची शोध मोहिम सुरु आहे. या सर्व घटनेनंतर नांदेडमध्ये शांतता पसरली आहे.

नांदेडमध्ये दरवर्षी शीख समाजाकडून होळीनिमित्त होला मोहल्ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र तरीही नांदेडमध्ये शीख समुदायाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते. या मिरवणुकीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने काही शीख तरुणांनी नांदेडमध्ये गोंधळ घातला. बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच परिसरातील गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांचा नियोजित कार्यक्रम सुरु असताना निशान साहेब गेट नंबर 1 पर्यंत आलं. पण बाहेर काढण्यावरुन त्यांच्यात आपसात वाद झाला. 300 ते 400 जण हल्लाबोलच्या तयारीने गेट तोडून बाहेर आले. त्यांनी पारंपरिक मार्गाने हल्लाबोल केला. यामध्ये चार कर्मचारी जखमी झाले आहेत. सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं आहे.
नांदेड येथील गुरूद्वारामध्ये होळी आणि ’हल्ला महल्ला’ मिरवणुकीसाठी जमलेल्या शेकडो शीख भाविकांनी आज संचारबंदी झुगारून पोलिसांवर हल्ला केला. काही समाजकंटकांनी या जमावाला भडकावल्याचे सांगितले जात आहे. संतप्त जमाव पोलिसांची बॅरिकेड्स तोडून गुरूद्वाराबाहेर पोलिसांवरच तुटून पडला. तलवारी घेऊन या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात आठ पोलीस गंभीर जखमी झाले. जमावाने पोलिसांच्या गाडय़ांचीही नासधूस केली.

नांदेडच्या गुरुद्वारामध्ये दरवर्षीप्रमाणे होळी आणि हल्ला महल्ला साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक बैठकांचे आयोजन केले होते. त्यात गुरुद्वारा परिसरात प्रतीकात्मक ‘हल्ला महल्ला सण साजरा करू असे सर्वानी बैठकीत सांगितले होते. त्यानुसार होळी सण साजरा झाला. पण आज निघणारी हल्ला महल्ला मिरवणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले. दुपारी नेहमी प्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडला. गुरुद्वाराचे सर्व गेट कुलुप लावून बंद करण्यात आले होते. परंतु उपस्थितांमधील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी भाविकांना भडकावून तलवारी उपसून गेटच्या दिशेने धाव घेतली. बंद गेटचे पुलूप तोडले आणि गुरूद्वाराबाहेर येताच बंदोबस्तावरील पोलिसांवर हल्ला चढवला.

रस्त्यावर आलेल्या शीखांच्या मिरवणुकीतील एकाने पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यावर तलवारीने प्रहार केला. त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी शेवाळे यांच्या बचावासाठी धाव घेतली. त्यांच्यामुळे पांडे यांचा जीव वाचला परंतु तलवारीने त्यांच्या पाठीवर वार झाला. त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी या हल्ल्यात थोडक्यात बचावले. पोलिसांच्या आणि प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या अनेक गाड्या जमावातील काही जणांनी फोडून टाकल्या.

विनापरवानगी हल्लाबोलची मिरवणूक काढून संतप्त शिख तरुणांनी चक्क पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत सहा पोलिस जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर पोलिस अधीक्षकांच्या शासकिय गाडीसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांनाही लक्ष करण्यात आले आहे. पोलिस विभागाकडून धरपकड सुरु असून सध्या वजीराबाद परिसरात तणावाचे वातावरण बनले आहे. हा प्रकार सायंकाळी सहाच्या सुमारास गुरुद्वारा परिसरात घडला.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काळ कठीण आहे. त्यामुळे शीख समाजाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतु गुरुद्वाराच्या वतीने परवानगी नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत हल्लाबोलची मिरवणूक काढली. एवढेच नाही तर संतप्त शीख युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स तोडून टाकले, हातात नंग्या तलवारी घेऊन शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. शेवटी पोलिस प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता चक्क त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. यात एसपीचे अंगरक्षक श्री. दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात स्वत: एसपी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, वजिय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले या हल्ल्यात बचावले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डाॅ विपीन यांनीही भेट दिली. हल्लेखोरांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह वाहनांची प्रचंड नासधुस केली. टायरमधील हवा सोडली, काचा फोडल्या. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून धरपकडीचे काम सुरु आहे. या प्रकरणात सध्या कुठलाही गुन्हा दाखल नसून या भागात तणावाचे वातावरण बनले आहे. पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
३१.०४.२०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *