जवळा देशमुख येथे कोरोनाबाबत जनजागृती कार्यक्रम

नांदेड – जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून  जिल्हा परिषदेच्या जवळा देशमुख येथील प्राथमिक शाळेत कोरोनाविषयक मास्क- सॅनिटाईझर-शारीरिक अंतर हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, हैदर शेख, शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी उद्वव शिखरे, शिवाजी शिखरे, ज्ञानेश्वर शिखरे, राजेश शिखरे, सदाशिव शिखरे, आबासाहेब शिखरे, रामप्रसाद शिखरे, सचिन शिखरे, अंगणवाडी कार्यकर्ती इंदिरा पांचाळ यांच्यासह मोजक्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शारीरिक अंतर राखूनच सदरील जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.


                  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद असतांना जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश देऊन गावपातळीवर कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जवळा देशमुख येथील शिवजयंती मंडळाच्या सहकार्याने परिसरातील विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आले. तसेच कोणत्याही कारणास्तव घराबाहेर न पडता आपली व आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच घराबाहेर पडल्यास मास्क-सॅनिटाईझर-शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करावा व इतरांनाही सांगावे असे मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *