राज्यात लॉकडाऊन लावायचं की नाही यावरून सध्या चर्चा जोरात सुरू असतानाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे येत्या दोन किंवा तीन एप्रिलला राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता आहे. अशी मिड-डेच्या वेबसाईटने शासकीय सूत्रांचा हवाला देऊन ही बातमी ३१ मार्चच्या दरम्यान दिली होती. लॉकडाऊन जाहीर होणार असला तरी तो अत्यंत मर्यादित काळासाठी असेल, असंही या बातमीत स्पष्ट करण्यात आलं होतं.
लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील. वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हदरम्यान दिला होता. परंतु, कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती आता स्पष्टपणे पुढे येत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू झाल्या आहेत.
जनतेला संबोधित केल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. संपूर्ण लॉकडाऊन न करता, वाढती रुग्णसंख्या रोखता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टेस्टिंग सेंटर्स, बेड्स, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पुरवठा या सुविधा वाढवणं प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहेत, त्या आणखीही वाढवता येतील. मात्र, रुग्णसंख्येला पुरे पडू शकतील एवढे डॉक्टर-नर्सेस कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर नाही.
राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना रुग्णसंख्येची वाढ अशीच कायम राहिली तर येत्या १० ते १५ दिवसांत सर्व बेड्स आणि संसाधनं अपुरी पडू लागतील, असं स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं होतं. "राज्यात लसीकरण मोहिम मोठ्या पातळीवर सुरू आहे. आपण आरोग्य सेवांमध्येही वाढ करत आहोत. पण कोरोनाची साखळी नेमकी तोडायची कशी? यावर अद्याप लॉकडाऊनशिवाय इतर दुसरा कोणताच उपाय नाही. लॉकडाऊन आज जाहीर करत नसलो, तरी इशारा देतोय. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय आणि निमावली जाहीर केली जाईल", असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याआधीच कडक निर्बंध
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये याआधीच जिल्हापातळीवर लॉकडाऊन संदर्भातील कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुण्यात आजपासून अंशत: लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर बीड, अमरावती, बुलढाणा, सोलापूरमध्येही कडक नियमांची तर काही ठिकाणी विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र दिसून आल्यानं आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नसल्याचं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल ४७ हजार ८२७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर २४ हजार १२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे.
मुंबईत तर कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद शुक्रवारी झाली आहे. एका दिवसात तब्बल ८८३२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण वाढतच असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आता ५८ हजार ४५५ वर पोहोचला आहे. परिणामी, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४६ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.४६ टक्के आहे.
मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह आणि लाॅकडाऊन
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात शुक्रवारी राज्यात 47 हजार 827 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 89 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.62 टक्के झाले आहे. आज दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.91 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 21 लाख 1 हजार 999 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 19 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक ८८३२ रुग्ण, २० रुग्णांचा मृत्यू
कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद शुक्रवारी मुंबईत झाली. एका दिवसात तब्बल ८८३२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढतच असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आता ५८ हजार ४५५ वर पोहोचला आहे. परिणामी, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४६ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.४६ टक्के आहे.
लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील. वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाइव्हदरम्यान दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अनेक मजुरांनी पुन्हा आपल्या गावची वाट धरली असून, घरी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे.
दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच यापूर्वीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगार पुन्हा घरची वाट धरू लागले आहेत.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या २० रेल्वेसेवा चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पाटणा या ठिकाणी जातात. यामध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात तब्बल ४७ हजार ८२७ कोरोना बाधित रुग्णांची वाढ शुक्रवारी नोंदवली गेली. नवीन २४ हजार १२६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून, एकूण २४,५७,४९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण ०३,८९,८३२ सक्रीय रुग्ण असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.
जनतेला संबोधित केल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. संपूर्ण लॉकडाऊन न करता, वाढती रुग्णसंख्या रोखता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टेस्टिंग सेंटर्स, बेड्स, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पुरवठा या सुविधा वाढवणं प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहेत, त्या आणखीही वाढवता येतील. मात्र, रुग्णसंख्येला पुरे पडू शकतील एवढे डॉक्टर-नर्सेस कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर नाही, असे सांगितले जात आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन होणार का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, संपूर्ण कोरोना परिस्थितीत कोणते राज्य आपल्याच जनतेला त्रास देत असेल, तर ते महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कशासाठी भाषण केलं हेच समजलं नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
नागपूर येथे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज गेल्या वर्षभरात दिले. देशातील अन्य राज्यांनीही जनतेसाठी पॅकेज दिले. केवळ महाराष्ट्राने एक पैशांचेही पॅकेज दिले नाही. मात्र, त्याऐवजी लोकांचे वीज कनेक्शन कापणे, लोकांना त्रास देणे यावरच भर दिला. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी केलेल्या आपल्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणे सांगितली नाही की, उपाययोजना सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केले? तेच समजले नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. राज्यात अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, उपाययोजना काय, व्यवस्था का नाही, याचे उत्तर द्यायला हवे होते. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला, या शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला.
मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी दिलेल्या अल्टिमेटमवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. मुख्यमंत्री म्हणतात की, दोन दिवसांत बघा. काय दोन दिवसांत बघायचंय, अशी खिल्ली उडवत लॉकडाऊन अपवादात्मक परिस्थितीत करावे लागते. तो अपवाद आहे, नियम होऊ शकत नाही. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे अन्नधान्य, खात्यावर जाणारे पैसे, अन्य सुविधा यांचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवे. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपसह अन्य विरोधी पक्षांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे, असे देशपांडे म्हणाले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका… किंबुहना ऐकाच, असे म्हणत फेसबुक लाइव्ह केले. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनची टांगती तलवार, आरोग्य यंत्रणा यांवर हल्लाबोल केला. आनंद महिंद्रा यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेत, कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी सरकारला जनतेला मदत केली. कोरोनाचे प्रमाण, प्रादुर्भाव कमी झाला. तेव्हा सरकारने अनेकांना नोकरीवरून काढून टाकले. मग आता पुन्हा लोकांना कसे बोलावणार, असा सवाल करत गरज संपल्यावर त्यांना सरकारने लाथाडले आणि पुन्हा आरोग्य सेवक कमी पडताहेत म्हणून मुख्यमंत्री सांगताहेत. लोकांनी विश्वास कसा ठेवावा. लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वासार्हता कमी झाली आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली.
लॉकडाऊनची भीती जनतेला दाखवली जात आहेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे व्यापारी शेतकऱ्यांना कमी किंमत देत आहेत, असा दावा करत गेल्या वर्षभरात गर्दी कमी करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या, किती अधिकाऱ्यांशी सल्ला-मसलती केल्यात, अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी यावेळी केली.
रस्त्यावर उतरून मदत कशी करायची, हे आता मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही. कोरोनाच्या काळात मनसे सैनिकांनी अगदी लाठ्या मारणाऱ्या पोलिसांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना शक्य ती सगळी मदत केली आहे. सरकारकडून काहीही मदत करण्यात आली नाही. कोरोना काळात जम्बो कोव्हिड सेंटर उभारून ओळखीच्या लोकांना काम देणे आणि पैसे वाटणे हेच काम सरकारने केले, अशी गंभीर टीका देशपांडे यांनी केली.
भाजपसह मनसे, काँग्रेस आणि अन्य पक्षांनीही लॉकडाऊन नको, अशी भूमिका घेतली आहे. यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी कोरोना परिस्थिती, आरोग्य यंत्रणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण या मुद्द्यांवरून टीका केली. मुख्यमंत्री हतबल आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबाचंही संरक्षण करू शकले नाहीत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. कोरोना परिस्थितीत काय उपयायोजना करायच्या, हे सांगत नाहीत. कोरोनाच्या संकटात जनतेला मदत काय करणार, यावर मुख्यमंत्री बोलत नाहीत, असे दरेकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आमची काळजी करू नये. कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हाही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो. मुख्यमंत्र्यांनी जनतेमध्ये जाऊन लॉकडाऊनमुळे होत असलेले नुकसान समजून घ्यावे, असा सल्ला दरेकरांनी दिला.
आम्ही राजकारण करत नाही. मुख्यमंत्री म्हणतात विरोधक राजकारण करत आहेत. मात्र, जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री स्वत: विरोधकांवर शेरेबाजी, टोलेबाजी, टीका करतात. हे राजकारण नाही का, अशी विचारणा दरेकर यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती निधी आला, हे एकदा तपासून पाहावे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली. केंद्र सरकारने अन्नधान्यांपासून ते कोरोनाच्या लसीपर्यंत सर्व सुविधा महाराष्ट्राला दिल्या आहेत. आव्हाड यांना याची कल्पना नसावी. परंतु, आम्ही त्यांना आकडेवारीच पाठवून देऊ, असे दरेकर म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनता, हातावरचे पोट असणारा गोरगरीब, कष्टकरी, बारा बलुतेदार, छोटे उद्योजक यांना जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने प्रथम व्यवस्था उभी करावी मगच लॉकडाऊनचा विचार करावा. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही कोरोनाच्या संकटात सरकारला साथ देऊ, पण सरकारने सामान्य जनतेचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं आहे.
राज्यातील वाढती संख्या लक्षात घेता या काळात कोरोना चाचणी मोफत उपलब्ध करावी आणि कोरोनाचे उपचार शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत उपलब्ध करावेत, अशी मागणी उपाध्ये यांनी केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारच्या फेसबुक लाईव्हमध्ये गांजलेल्या जनतेच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा होती मात्र ती सपशेल फोल ठरली. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी ठोस कृती आराखडा, अंमलबजावणीचा पथ, विशेष उपाययोजना याबाबत मुख्यमंत्र्यांकडून किमान अपेक्षा होत्या मात्र कोणतीच ठोस कृती, निर्णय किंवा यापुढची उपाययोजना मुख्यंत्र्यांनी सांगितली नाही. त्यांनी केवळ लॉकडाऊनचा इशारा दिला. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारच्या दिशाहीन धोरणामुळे हजारो कुटुंबांची अक्षरशः वाताहत झाली. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यास अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतील असं म्हटलं आहे.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन केल्यानंतर समाजातील विविध घटकांची काळजी घेत पॅकेज दिले होते. जवळपास सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत पाच किलो गहू, तांदूळ आणि एक किलो चणा मोफत अथवा किमान किंमतीमध्ये दिला होता. याचा 80 कोटी जनतेला लाभ झाला होता. तसेच 8 कोटी कुटुंबांना गॅस सिलेंडर मोफत दिले होते. शेतकरी, महिला व गोरगरीब यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम दिली होती. केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांना केलेल्या मदतीखेरीज काही राज्यांनी आपापल्या तिजोरीतून त्या राज्यातील जनतेला पॅकेज दिले. परंतु, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने मात्र आजपर्यंत राज्यातील सर्वसामान्य जनतेला कोणतेही पॅकेज दिलेले नाही” असं देखील उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
गेल्या वर्षी राज्यात लॉकडाऊन घोषित करताच भाजपाचे सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लोकांना सर्व प्रकारची मदत केली आहे. आताही भाजपाचा कार्यकर्ता राज्याचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. पण राज्य सरकारने निस्वार्थीपणाने जनतेची काळजी करावी, कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, लसीकरणाची मोहिम गंभीरतेने राबवावी, सर्वसामान्य व्यक्तींना ओषधोपचार मिळतील याकडे लक्ष द्यावे व ज्यांना ओषधोपचार परवडणार नाहीत त्यांना मोफत उपचार द्यावेत असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
राज्यातील वाढती रुग्णसंख्या, कोरोनाला रोखण्यात अपयश आलेलं महाविकास आघाडी सरकार आणि पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील विरोधकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनापर्यंत, उद्योजकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि फेसबुकपासून ट्विटपर्यंत सर्वत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक पोस्ट लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याला सलाम केलाय.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. त्यानंतर, भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. तर, इतरही विरोधकांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड खंबीर पाठीराखे बनून उभारले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, तुमचं वजन वापरुन, केंद्राकडून राज्याचे पैसे आणावे, असा खोचक टोलाही लगावला. त्यानंतर, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याचं आव्हाड यांनी कौतुक केलंय.
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत… त्यास सलाम ! सलाम !! सलाम !!!, असे भावनिक ट्विट आव्हाडांनी केलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे रश्मी ठाकरे रुग्णालयात आहेत, तर दुसरीकडे आदित्य यांनाही कोरोनाची बाधा झालीय.
उद्धव ठाकरे यांची दोनवेळा एन्जिओप्लास्टी झाली आहे. त्यामुळे ते आपल्या प्रकृती विषयी पूर्वीपासूनच जागरूक आहेत. ते नियमित व्यायाम करतात. डॉक्टरांच्या सतत संपर्कात असतात. तर, त्यांच्या ह्रदयात अनेक स्टोन्स असतानाही ते ज्या धीरदोक्तपणे महाराष्ट्र सांभाळतायंत, यावरुन आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना सलाम केला आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
दि.३/०४/२०२१