नांदेड – माजी खासदार गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली. खासदार,आमदार,राज्यमंत्री अशा विविध पदांवर काम करण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. त्यांच्या रूपात ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला नेता आपण गमावला, अशा शब्दांत नांदेडचे पालकमंत्री ना. अशाेकराव चव्हाण यांनी गंगाधरराव कुंटुरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांचे पुत्र राजेश देशमुख कुंटुरकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून त्यांचे सांत्वनही केले.