कंधार ; प्रतिनिधी
वयाच्या 19 व्या वर्षी जम्मु कश्मिर येथे देश सेवा बजावत असताना 3/4/2018 रोजी 7 आतंकवाद्यांना कंठस्नान घालुन विर मरण पत्कारणारे कोनेरवाडी ता.पालम जिल्हा परभणी येथील विर पुत्र शहीद शुभम मुस्तापुरे यांना कंधार लोहा तालुक्यातील माजी सैनिकांसह नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या वतीने आज दि.३ मार्च रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली.
विर शहीद जवानांचा आज तिसरा शहीद दिवस आहे.या शहीद विर पुत्राला श्रद्धांजली वाहण्यात आली.व या विर पुत्रांच्या भाग्यवान आई वडील व आजी आजोबा यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळस माजी सैनिक संघटना नांदेड चे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, परभणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सातपुते, पालम तालुक्याचे तालुका अध्यक्ष पोळ , कंधार चे तालुकाध्यक्ष अर्जुन कांबळे ,नायगाव चे तालुकाध्यक्ष बेंद्रीकर गणेश, लोहा तालुका अध्यक्ष संजय जाधव ,कंधार संघटनेचे सचिव पोचीराम वाघमारे, कार्य अध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, गंगाखेडचे सेवारत सैनिक देवकते, माजी सैनिक मुस्तापूरे ,माजी सैनिक शिवराम आष्टुरकर व सुरेश वैध आदीची यावेळी उपस्थिती होती.यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी मनागत व्यक्त केले.