लोहा- कंधार रस्त्यांसाठी १७ कोटी २७ लाख निधी मंजूर ;खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या पाठपुराव्यास यश

कंधार ; प्रतिनिधी

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार तालुक्यातील ग्रामीण रस्ते विकासासाठी केंद्र सरकारने १७.२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले असल्याची माहीती खासदार श्रृंगारे यांच्या संपर्क कार्यालयातून आज दि.३ एपिल रोजी देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिवृष्टी व वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झालेली होती. खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी लक्षात घेऊन खासदार सुधाकर श्रृंगारे, खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सावरगाव – निपाणी – वरवंड रस्ता, लोहा तालुक्यातील ढाकणी- वडेपुरी- हरबळ रस्ता तर शेवडी ते शेवडी तांडा खडकमांजरी या रस्त्यासाठी असे एकूण जवळपास १७.२७ कोटी निधी रस्त्यासाठी मंजूर झाला आहेत.

यावेळी पहिल्या टप्प्यात प्राधान्याने ०३ रस्ते केंद्रशासनाने मंजूर केलेले आहेत. या रस्त्यासाठी एकूण १७.२७ कोटी रक्कमेच्या कामास मंजूरी मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था सुधारणासाठी निश्चितच फायदा होणार आहे. तसेच ग्रामीण रस्ते विकासाला गती मिळणार आहे.

प्रधानमंञी ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे जाळे पूर्ण ग्रामीण भागात लवकरच पसरणार असून रस्त्यांना अच्छे दिन येणार आहेत. या मंजूर झालेल्या रस्त्यांचा लाभ लोहा व कंधार तालुक्यातील सर्व जनतेला होणार आहे. १७.२७ कोटी रुपये निधी रस्त्यासाठी मंजूर केल्याबद्दल खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. सुधाकर श्रृंगारे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचे विशेष आभार मानले आहे.

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रधानमंञी ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामाची लवकरात लवकर तातडीने निविदा काढून हे कामे लवकरच सुरु करण्यात येतील असा विश्वास खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

….

प्रधानमंञी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील लोहा व कंधार तालुक्याच्या विकासासाठी १७.२७ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मंजूर झालेला असून उर्वरीत दुसऱ्या टप्यातील रस्त्यांसाठी निधी लवकरच मंजूर होणार आहे. याकामी मी व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद मोदी, केंद्रीय ग्रामविकासमंञी नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागांत रस्त्याच्या विकासासाठी गती मिळावी म्हणून सदैव प्रयत्नशील राहिलो आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

..खा. सुधाकर श्रृंगारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *