नांदेड – तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे फाल्गुन पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या विशेष श्रामणेर शिबिरातील सहभागी प्रशिक्षणार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो, साहेबराव डाकोरे, राहुल कोकरे, विजय गच्चे, शिवाजी कंधारे, बळीराम निखाते, प्रा. हर्षवर्धन लव्हाळे यांची उपस्थिती होती.
फाल्गुन पौर्णिमेनिमित्त दि. १८ ते २८ मार्च या कालावधीत श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्राच्या वतीने विशेष श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत तीन टप्प्यांत एकूण तीस जणांना दीक्षा देण्यात आली. हा कालावधी संपल्यानंतर फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधून सतीश मोगले, दिलीप सावतकर, अविनाश खंदारे, शौर्य जोगदंड, श्रीशांत जाधव, निलेश गायकवाड, कुणाल गायकवाड, श्रेयस गायकवाड, अंकुश गायकवाड, रोहन जोगदंड, आदित्य गायकवाड, प्रतिक सोनकांबळे, निहाल लव्हाळे आदिंना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललिता दवणे, आरती वांगीकर, रवी नरवाडे, उमाजी नरवाडे, रामा नरवाडे, वामन नरवाडे, सुरज नरवाडे, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, कृष्णा नरवाडे, राजरत्न नरवाडे, आकाश नरवाडे आदींनी परिश्रम घेतले.