एन डी राठोड : सुह्दयी कार्यकर्ते.


सेवानिवृत्त विस्तार अधिकारी तथा जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड यांचा आज ०४ एप्रिल हा वाढदिवस. गतवर्षीच्या लाँकडाऊनमध्ये दु:खद निधन झालेल्या गणेश सं भदाडे वैरागडकर यांच्या मुलीच्या लग्न कार्यासाठी राठोड सरनी स्वतः पुढाकार घेऊन ५० ( ४ ) ५० हजार रुपये जमा केले.दिपावली २०२० मध्ये छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपच्या सन्मानीय सदस्यांनी महतप्रयासाने जमा रक्कमेचा एफ डी महेश अर्बन बँकेत काढला. भदाडे कुटुंबायांचे भावी आयुष्य टेस्टी – टेस्टी केले. आणि प्रकाशाचा सण दिवाळीत ,एक दिवा प्रकाशमान केला. आमदार तथा पनन महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ती एफ डी भदाडे कुटुंबायांच्या स्वाधीन करण्यात आली. केवळ १०० रुपये देऊन मलाही यात खारीचा वाटा उचलता आला. त्याचा निर्भेळ आनंद मला एन डी राठोड यांच्यामुळे घेता आला. वाढदिवसाच्या निमित्ताने सरांच्या सुह्दयी कार्यकर्तेपणाचा उहापोह करणारा ,आढावा घेणारा प्रा भगवान आमलापूरे यांचा हा छोटेखानी लेख. संपादक.
अहमदपूर तालुक्यातील मौजे वैरागड येथील गणेश संग्राम भदाडे हे अहमदपूर येथील किलबिल नँशनल स्कूलच्या स्कूलबसवर चालक म्हणून कार्यरत होते. पण या अल्प मिळकतीत संसाराचा गाडा चालविणे त्यांना जिकिरीचे झाले होते. त्यात त्यांचे भागत नव्हते. त्यामुळे ते स्कूलबस सोडून आपल्या कष्टाचा थोडा जास्तचा मोबदला मिळेल म्हणून सहकुटुंब पुण्याला गेले.
पण नियतीला जणू ते पण मान्य नव्हते. जागतिक कोरोना महामारीच्या निमित्ताने सबंध देशभरात लाँकडाऊन झाले. आणि गणेशच्या हातचे पुण्यातील ते पण काम गेले.आर्थीक टंचाईमुळे त्यांना मानसिक दडपण यायला लागले. त्याच दडपणामुळे त्यांनी स्वताची जीवन यात्रा संपवली. आणि सुरू झाली एक आबाळ !
वैरागडचे ग्रामसेवक शाम मुसके, ग्रामसेवक संघटना आणि वैरागड ग्रामपंचायतने गणेश भदाडे यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि आर्थिक भार पण उचलला.
म्हणतात की, कुठे गेले कोकणा आणि तीन पानं चुकना ! कुणी म्हणेल नशीब, कुणी म्हणेल प्राक्तन तर कुणी म्हणेल त्यांचे आयुष्यंच तेवढे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की या जागतिक कोरोना महामारीतच त्यांचे पुण्यात दु:खद निधन झालं. घर – संसार उघड्यावर आला. घरातील एकमेव कर्ता पुरुष कालपुरुष्याच्या स्वाधीन झाला. आणि सुखी संसाराला दिष्ट लागल्यागत संसार उघड्यावर आला. लेकरं ( कु समिक्षा वय ११ वर्षे आणि सार्थक ०८ वर्षे ) पोरकी झाली. आई – वडिलांना म्हातारपणी असणारी काठी काळाने हिरावून नेली.


दिवंगत गणेश भदाडे यांच्या निधनाची बातमी वर्तमानपत्रात वाचून अध्यक्ष , वसंतराव नाईक ग्रामीण लोकसेवा संस्था अहमदपूर,तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एन डी राठोड सर यांच्यातील ” सुह्दयी कार्यकर्ता ” जागा झाला.त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन छत्रपती शाहूराजे योगा ग्रुपच्या माध्यमातून भदाडे कुटुंबीयांना प्रथमतः शक्य तेवढी मदत करण्याचे ठरविले. या कामात द्वारकादास शामकुमार ग्रुपचे अहमदपूर येथील सर्वेसर्वा शिवाजीराव सुर्यवंशी यांनी शालेय गणवेश तर ओम बँग हाऊसचे श्री घुगे यांनी शालेय दप्तर भदाडे भावंडांना मदत म्हणून दिले. आणि माणूसकीचा एक धागा गुंफला.
जागतिक कोरोना महामारीने ढगाळलेल्या या काळात भदाडे कुटुंबीयांवर कोसळलेल्या आकाशामुळे सारं जणू आंधारमय झाले होते. पण एन डी राठोड यांचा पुढाकार आणि ती एफ डी जणू भदाडे कुटुंबीयांना उभारी आणि ” एक प्रकाश कवडसा ” च आहे. असे म्हणता येते.


आपल्यातील कार्यकर्ताच मदतीचा हात पुढे करतो. असी एन डी राठोड यांची प्रांजळ भावना आहे.शिवाय सामाजिक बांधीलकी जपून ही मदत केली आहे.त्यामुळे उघड्यावर पडलेल्या कुटुंबातील सदस्यांना समाजाकडून बऱ्या प्रमाणात अर्थिक आधार मिळाला आहे.असंही ते म्हणाले.
कु समिक्षा भदाडे वैरागडकर,वय वर्षे ११,वडील गणेश भदाडे लाँकडाऊनमध्ये म्रुत्यु पावले, हल्ली मुक्काम धसवाडी ता अहमदपूर येथे आहे. तीच्या भविष्यासाठी आर्थिक मदत सहकार्य करणाऱ्या दानशूर बांधवांची यादी पुढील प्रमाणे आहे.प्रथमतः १००० रुपये दाते.एन डी राठोड , सेवानिवृत्त विस्तार अधिकारी,प्रा गोविंदराव शेळके,अनिल बोडके, वळसंगी, अहमदपूर ता काँग्रेस अध्यक्ष डॉ गणेशराव कदम, विजय श्रीराम गुंडाळे सावकार,अशोकराव चापटे, ग्रामसेवक आर बी नागरगोजे, गँस एजन्सी महेंद्र खंडागळे, ग्रा वि अधिकारी अशोकराव लामदाडे, ग्रा वि अधिकारी भदाडे यु डी, दिलीप पाटील बोरगावकर, अविनाश देशमुख धसवाडीकर, प्रा रत्नाकर नळेगावकर, सौ अनुराधा रत्नाकर नळेगावकर, आणि यश रत्नाकर नळेगावकर. द्वारकादास शामकुमार यांनी ९०० रुपये, बी डी कांबळे, सेक्रेटरी तांबट सांगवी यांनी ६०० रुपये.तर हरिभाऊ नागमोडे सेक्रेटरी १२०० रुपये, किलबिल इंटर नँशनल स्कूल – ज्ञानोबा भोसले २००० रुपये, दत्ताभाऊ गलाले २००० रुपये, अशिष यंगाले, सुखमनी व्रद्धाश्रम २००० रुपये, कदम सर, पायलट किराणा २००० रुपये, माधवराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य ३००० रुपये, आणि डॉ बाळासाहेब बयास ,सचिव रुग्ण सेवा समिती, अंधोरी, २००० रुपये दिले आहेत. इतर २४ जणांनी प्रत्येकी ५०० रुपये दिले आहेत.अविनाश मंदाडे आणि हणमंत मुळे यांनी प्रत्येकी ४०० रुपये दिले आहेत. १६ जणांनी प्रत्येकी २०० रुपये मदत केली आहे तर ग्रामसेवक पिंजारी आय डी यांनी २५० रुपये मदत केली आहे. इतर ३४ जणांनी प्रत्येकी १०० रुपये रोख मदत केली आहे. या १०० रुपये देणाऱ्या ३४ जणांपैकी मी एक आहे. एकंदरीत १०१ पालक – दात्यांनी भदाडे भावंडांचे ( कु समिक्षा आणि सार्थक ) पालकत्व स्विकारले आहे.
निर्विवादपणे जग दिवसेंदिवस झपाट्याने बदलत आहे.बालरोगतज्ज्ञ डॉ अरूण गोधमगावकर यांचे आपल्याच परिसरात झालेल्या निधनानंतर एकदा आणि सध्याच्या जागतिक कोरोना महामारीच्या काळात याची मोठ्या प्रमाणावर प्रत्येकालाच प्रचिती आली आहे. हात ऊसणे मागितले तर कुणी वेळेवर पैसे देईलंच असं राहीलं नाही. अगदी हो भरून सुद्धा. आपण कुणाला हात ऊसणे पैसे दिले तर ते वेळेवर परत येतील. याची पण शक्यता कमी होते आहे. विशेषतः लाँकडाऊन काळात उद्याचे कसं की, काय की ? या प्रश्नाने प्रत्येकाला ग्रासलेले होते. लोकांची संग्रही व्रती वाढली होती. अशा पार्श्वभूमीवर ५० ( ४ ) ५० रुपये दान म्हणून जमा करणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे होते. किंबहुना आधुनिक काळातील गोवर्धन पर्वतच उचलणे असेआम्हाला वाटते आहे. एन डी राठोड सरांना पुढील आयुष्यात अशाच विधायक आणि समाजोपयोगी कार्यासाठी निरोगी आयुष्य लाभावे , अधिकची ऊर्जा मिळावी. ह्याच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


प्रा भगवान आमलापूरे
फुलवळ मो ९६८९०३१३२८
द्वारे शं गु महाविद्यालय,
धर्मापुरी ता परळी ( वै )

एफ डी सुपूर्द करताना आमदार तथा राज्य पनन महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील ,एन डी राठोड , इतर कार्यकर्ते आणि भदाडे कुटुंबीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *