नांदेडात रविवारी 1 हजार 186 व्यक्ती कोरोना बाधित, 27 जणांचा मृत्यू

जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन!

नांदेड दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 844 अहवालापैकी 1 हजार 186 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 993 जण बरे होऊन घरी गेले असून, आज रोजी 27 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.

यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 512 तर अँटिजेन तपासणीद्वारे 674 अहवाल बाधित आहेत. यात मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 552 एव्हढी आहे.
जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 47 हजार 669 एवढी झाली असून यातील 35 हजार 642 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 891 रुग्ण उपचार घेत असून 165 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर , सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक 31 मार्च ते 3 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 896 एवढी झाली आहे.

आज रोजी 1 हजार 13 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.54 टक्के आहे.जिल्ह्यात 10 हजार 891 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 34 हजार 260

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 79 हजार 742

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 47 हजार 669

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 35 हजार 642

एकुण मृत्यू संख्या-896

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.76 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-60

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 381

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 891

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-165.

#Nanded #CoronaVirusUpdates

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *