आमदार रावसाहेबाजी अंतापुरकर यांच्या अंत्यसंस्कार वेळी गर्दी करु नका – तहसिलदार विनोद गुंडमवार

देगलूर ; प्रतिनिधी


देगलूर तालुक्यातील सर्व जनतेस प्रशासनाकडून जाहीर आवाहन करण्यात येते की, मा. आमदार रावसाहेबाजी अंतापुरकर यांचे काल रात्री दीर्घ आजाराने निधन झालेले आहे. ही आपणासर्वासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.


आज दि.१० रोजी अंतापूर येथे मा. आमदार महोदय यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहे. सध्या जिल्ह्यात कोविड चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व जनतेना विनम्र विनंती करण्यात येते की अंत्यसंस्कार वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये व प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती.

विनोद गुंडमवार
तहसीलदार देगलूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *