आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कंधार तालुक्यातील सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप

कंधार ; प्रतिनिधी

तहसील कार्यालय कंधार येथे लोहा कंधार विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते दि.१० एप्रिल रोजी आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांच्या नातेवाईक व जनावरांच्या नुकसानभरपाई आणि अतिवृष्टीचे पाणी घरात जावून झालेल्या नुकसान बद्दल सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले .यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे व नायब तहसीलदार विजय चव्हाण साहेब उपस्थित होते.

७ मार्च २०२१ रोजी मंगलसांगवी येथिल मयत गोविंद व्यंकटी कदम यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती ,त्यांचे वारसदार पत्नी अमिताबाई कदम यांना १ लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.तसेच १९ मार्च रोजी २०२१ रोजी लालवाडी येथिल एक बैल ,२ गाय दगावली होती.त्याचे मालक लाभधारक पांडुरंग कल्याणकस्तुरे यांना ८५ हजाराचा धनादेश देण्यात आला.तसेच औराळ येथिल एक बैलासाठी कमलकिशोर पवळे यांना २५ हजार रुपये,तसेच चौकी धर्मापुरी येथिल १ गाय दगावली होती त्याबद्दल बालाजी डावकोरे यांना तीस हजार रुपयेचा धनादेश देण्यात आला.

तसेच अतिवृष्टीमुळे घरात पाणी जावून संसार उपयोगी साहित्य व धान्य भिजल्यामुळे कंधार तालुक्यातील काटकळंबा येथिल सात जणांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे ३५ हजार सानुगृह मदत मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कंधार तहसिल कार्यालयाकडून राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत 10 विधवांना अर्थसहाय्य, शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबीयांना, विजपडून मयत झालेल्या पशुच्या पालकांना,व जळीत घर प्रकरणांतील पिडीतांना सानुग्रह अनुदान मा. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते वितरीत प्रसंगी
तहसिलदार व्यंकटेश मुंडे, संगांयो शाखेचे नायब तहसीलदार विजय चव्हाण,संगांयो शाखेचे बारकुजी मोरे नैसर्गिक आपत्ती शाखेचे राम पांचाळ, प्रतिनियुक्त कर्मचारी मन्मथ थोटे गुरुजी उपस्थित होते.तसेच कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चोंडे,सतीश पानपट्टे, बंटी गादेकर, आदींची उपस्थिती होती‍.

2 thoughts on “आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कंधार तालुक्यातील सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *