कंधार ; प्रतिनिधी
कोव्हीड -१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता व दररोज कोरोना रुग्णाच्या पेशंन्ट मध्ये वाढ होत असल्याने सध्या नांदेड जिल्हातील रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यामुळे अनेकांना त्यांचा जिव गमवावा लागत असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या गंभीर बाबीचा विचार करुन कंधार लोहा तालुक्यासह नांदेड जिल्हात कोरोना रुग्णासांठी बेड उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवानेते शिवराज पा.धोंडगे यांनी निवेदनाद्वारे केली आले.
कंधार लोहा तालुक्यासह नांदेड जिल्हात कोरोणा रुग्णांसाठी बेड संख्या वाढवा – राष्ट्रवादी युवानेते शिवराज धोंडगे यांची मुख्यमंत्र्यांना मागणी एप्रिल रोजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना राष्ट्रवादी युवानेते शिवराज पा.धोंडगे यांनी मेल द्वारे निवेदन पाठवले आहे.त्यामध्ये असे नमुद केले आहे की मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी नांदेड सह ग्रामिण भागात कोरोनाचे रुग्णसंख्या विचारात घेवून कोरोना उपचारासाठी बेड वाढवणे आवश्यक आहे.
नुकतेच नांदेड येथे एकाच सरणावर सुमारे आठ दहा जणांचा अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बाब गंभीर आहे.तसेच नांदेड येथिल कै.शंकरराव चव्हाण रुग्णालयत आता रुग्ण संख्या जास्त असल्याने व बेड संख्या कमी असल्याने कोरोना पॉझेटिव रुग्णाची हेळसांड होऊन जिव गमवावा लागत आहे त्यामुळे शहरासह संपुर्ण ग्रामिण भागातील रुग्णांना सेवा मीळत नाही.व पुढील काळात असाच उद्रेक झाला तर यांचे परिणामही गंभीर होतील त्यामुळे लवकरात लवकर कोरोना बेड उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवा नेते शिवराज पाटील धोंडगे यांनी निवेदनद्वारे केली आहे.