कंधार ;ता. प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे पावसाळ्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती उद्भवून झालेल्या अतिवृष्टीत सुमारे ७ घराचे अतोनात नुकसान झाले होते. त्यांना १० एप्रिल रोजी कंधार हसील कार्यालयात प्रत्येकी पाच हजाराचे सानुग्रह अनुदान मामा मित्र मंडळाचे संस्थापक मारोती मामा गायकवाड व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे पावसाळ्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुराचे पाणी घरात जाऊन काटकळंबा येथील सात जणांचा संसार उपयोगी साहित्याची नासधूस झाली होती. या घटनेची तात्काळ माहिती मामा मित्रमंडळाचे संस्थापक मारोती मामा गायकवाड यांनी तलाठी जाधव यांना देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन गोरगरीब बौद्ध व मातंग समाजातील नागरिकांना नुकसानीचा मावेजा मिळावा म्हणून पाठपुरावा केला होता.
तब्बल ६ महिन्यानंतर दिनांक १० एप्रिल रोजी कंधार तहसील कार्यालय येथे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मामा मित्रमंडळाचे संस्थापक मारोती मामा गायकवाड, पांचाळ साहेब, मन्मथ थोटे यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान हरीदास कांबळे ,चंद्रकांत कांबळे ,देविदास कांबळे,रावसाहेब कांबळे ,रमेश कांबळे ,रामकिशन कांबळे ,नारायण कांबळे या सात जणांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.