कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास जनतेत अजूनही उदासीनताच..ग्रामीण भागात जनजागृती करण्याची आवश्यकता

प्रा.आरोग्य केंद्र पानशेवडी अंतर्गत असलेल्या आठ उपकेंद्रात एकूण ५०१२४ लोकसंख्येपैकी पात्र १५०३७ लोकांपैकी फक्त ३५५४ जनानी घेतली लस ..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

  कंधार तालुक्यातील फुलवळ जि. प.गटात असलेल्या प्रा.आ.केद्र पानशेवडी च्या कार्यक्षेत्रात असलेल्या आठ उपकेंद्रातील एकूण लोकसंख्या ५०१२४ असुन त्यात ४५ वर्षापुढील १५०३७  लोकसंख्या असुन त्या पैकी ३५५४ लोकांनीच कोरोना प्रतिबंधात्मक कोविशील्ड ची लस घेतली असल्याची माहीती आरोग्य सुपरवायझर शेख मुस्ताख अल्ली यांनी दिली . तसे पाहता सरासरी आठ आरोग्य उपकेंद्रात फक्त २३.६३% टक्के लोकांनीच  लस घेतली असुन ही लस घेण्यास म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसुन लोक लस घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यामुळे अजूनही जनतेच्या मनात उदासीनताच असून विशेष करून ग्रामीण भागात आजही याबाबद जनजागृती करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

एवढेच नाही तर याच पानशेवडी प्रा.आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ५०१२४ लोकसंख्ये पैकी फक्त १७९३ लोकांनीच ॲन्टीजन टेस्ट केली असुन टेस्ट करण्यासाठीही लोक समोर येत नसल्याचे समोर आले आले आहे.

   प्रा.आरोग्य पानशेवडी अर्तगत असलेल्याआठ उपकेंद्रापैकी  पानशेवडी येथे ३१२६ लोकसंख्ये पैकी ४५ वर्षापुढील ९३८ लोकसंख्या असुन ३०४ लोकांनी लस घेतली , पोखर्णी उपकेंद्रात ४१५६ लोकसंख्या असुन ४५ च्या पुढील १२४७ लोकसंख्या असुन ३२६ लोकानी लस घेतली , फुलवळ उपकेंद्रात एकूण लोकसंख्या ५५९४ असून त्यात ४५ च्या पुढले १६७८ असून ४५३ जनानीच लस घेतली.  आंबुलगा उपकेंद्रात लोकसंख्या ६५५८  असुन ४५ पुढली १९६७ इतकी लोकसंख्या असुन ६०१ लोकांनी लस घेतली , बहद्दरपुरा उपकेंद्रात लोकसंख्या ११२१४ असुन ४५ वर्षा च्या पुढली ३३६४ लोकसंख्या असुन ५२६ जनानी लस घेतली सर्वात कमी म्हणजे १५.६३ % ईतक्या लोकानीच लस घेतली तर  पानभोसी उपकेंद्रात लोकसंख्या ७६२१ एवढी असुन त्यातील ४५ च्या पुढील २२८६ आहेत त्या पैकी ३६८  जनानी लस घेतली व शेकापुर उपकेंद्रात ५५१९ ईतकी लोकसंख्या असुन ४५ च्या पुढचे १६५६ लोकसंख्या असुन या पैकी ४७७ लोकानी लस घेतली तर घोडज उपकेंद्रात ६३३६ लोकसंख्या असुन ४५ च्या पुढील १९०१ ईतकी लोक लस घेण्यासाठी पात्र असुन फक्त ४९९ लोकानीच लस घेतली असुन ही आकडेवारी ही लसीकरनाची मोहीम चालु झाल्यापासुन ते १६  एप्रिल पर्यतची असल्याची माहीती पानशेवडी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ फरझान मॅडम यांनी दिली.

एकूण लसीकरणासाठी आठ उपकेद्रात पात्र असनारे १५०३७ एवढे लोक असुन त्यापैकी ३५५४ लोकानी लस घेतली असुन सरासरी २३.६३ % ईतक्याच लोकानी लस टोचुन घेतली .तर आणखी ११४८३ लोकांना लस देणे बाकी असल्याचे कळते.

  यासाठी फुलवळ उपकेद्राचे डाॅ.शेख, सुपरवायझर मुस्ताख अल्ली, आरोग्य सेवक सुधाकर मोरे, जयश्री गुंड्डे, लतिका मुसळे अदी कर्मचारी मेहनत घेत असुन ५०१२४ लोकसंख्ये पैकी केवळ १७९३ लोकानी कोरोनाची टेस्ट केली असल्याची माहीती मिळाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *