माणूसकीचे दर्शन देणारा मुख्याध्यापक आर.जी. पवार सर काळाच्या पडद्याआड.


कुरुळा-ग्रामीण भागात बालाघाटाच्या पायथ्याशी असलेल्या माळरानावरील रामानाई तांडा येथे एका शेतकरी
कुटुंबात जन्मलेले रावसाहेब गुंडाळी पवार अतिशय गरीबी तुन शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी ग्रामीण शिक्षण मंडळाच्या माध्यमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरी
करत या भागातील विद्यार्थ्यांना
शिक्षण देऊन तसेच त्यांना कौशल्य विकसित करण्यासाठी
अहोरात्र प्रयत्न करत.नौकरी
करत असतांनाच अतिशय प्रामाणिक पणे काम करायचे.
सेवानिवृत्त होईपर्यंत याच माळरानावर नेहरुनगरलाच
स्थाईक राहुन प्रत्येकाला मदतीचा
हात देत माणुसकी चे दर्शन
देणारा मुख्याध्यापक होते.
अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या अनेक
अडचणी सोडवायचे, तसेच
यामुळे या भागात आर.जी. पवार
सर म्हटलं की घराघरात ओळख
आपल्या मायेने ममतेने आपलंसं
वाटणार व्यक्तीमत्व होत.
अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला
आर.जी. पवार सरांनमुळे
कलाटणी मिळाली. होतकरू
विद्यार्थ्यांना सर विशेष मार्गदर्शन
करायचे. गरजुंना मदतीचा हात
द्यायचे .
कुठेही भेट ले तर अतिशय तळमळीने आमची विचारपूस करायचे. खरच सर.तुम्ही आम्हाला सोडून गेलात. आम्ही
पोरके झालोत. मात्र तुम्ही आम्हाला दिशा देऊन सुर्योदयाचा
मार्ग दाखविला व समाजात सन्मानाने जगण्यालायक बनवलात. सर गेलात फक्त देह रुपाने आठवणीने नाही.
आशिर्वाद तुम्हचे आमच्या पाठीशी . डगमगणार नाही आम्ही.

प्रतेकाच्या मनाला पाझर फोडणार व माणुसकी चे
दर्शण देणाऱ्या व्यक्तीमत्त्वास
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.


-आपलाच विद्यार्थी
श्रीराम फाजगे
लोकमत पत्रकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *