भाजपाच्या आधार गरजूंना उपक्रमाचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे हस्ते शुभारंभ

नांदेड : भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोना वैश्विक महामारीचा पार्श्वभूमीवर आजपासून दवाखान्यात उपचार घेत आसलेल्या रूग्णांचा नातेवाईकांना जेवनाचा डब्बा देण्याचा उपक्रमाचा शुभारंभ नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, आधीष्टाता डॉ.दिलीपराव म्हैसेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.वाय.एच चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश कार्यकारणी सदस्य संतुकराव हंबर्डे, प्रदेश कार्यकारणी सदस्य एडवोकेट चैतन्य बापू देशमुख, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, अभियानाचे प्रमुख जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण दिलीप ठाकूर यांचे प्रमुख उपस्थितीत विष्णूपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय हॉस्पिटल, नांदेड येथे करण्यात आला.


मागील वर्षी कोरोना महामारमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वात कम्युनिटी किचनद्वारे असंख्य गरजूंना अन्न पुरवण्याचा काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. यावर्षीही कोरोनामुळे अनेक कुटुंब बाधित झाले असून अनेकांच्या घरचे रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे. अशावेळी त्या रुग्णांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी त्यांची पोटाची भूक भागविण्यासाठी भाजपच्यावतीने आधार गरजूंना या उपक्रमाद्वारे दररोज 1000 जेवनाचे भरलेले डब्बे पुरविण्याचे काम खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष प्रविण साले, सरचिटणीस दिलीप ठाकूर यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आले. नांदेड मधे आगामी पंधरा दिवस रोज पांच ठिकाणी म्हनजे जिल्हा रुग्णालय विष्णूपूरी, जिल्हा रुग्णालय शिवाजी पुतळा, डॉक्टर लेन, बोरबन कंपाउंड , वाडीया कंपाउंड या ठिकाणी सकाळी 11 ते 12 या वेळेत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले,
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, नगरसेवक राजू गोरे, नगरसेवक जनार्दन गुपीले, सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, दक्षिण ग्रामीण मंडळ अध्यक्ष सुनील मोरे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमोल ढगे, जिल्हा चिटणीस मनोज जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धीरज स्वामी, सोशल मीडिया प्रमुख राज यादव, कार्यालय चिटणीस कुणाल गजभारे, आनंद दासरवार, अरुणकुमार काबरा, संतोष भारतीय, गजानन कत्ते, उमेश स्वामी, मंगेश कदम, शाहू महाराज, विशाल दगडू अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मभूषण दिलीप ठाकूर, अरुणकुमार काबरा, संतोष भारतीय यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी तर संचालन धीरज स्वामी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *