कंधार प्रतिनीधी
राज्यात कोरोना व्हायरसने तांडव घातले असल्याने राज्य सरकार अनेक उपाय योजना राबवत असुन कोरोना बाधित रुग्णाची हेळसांड होणार नाही यासाठी कडक पाऊले उचलत आहे.कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पोष्टीक आहार देण्याचा नियम असताना कंधार कोविड सेंटरमध्ये मात्र रुग्णांना पोष्टीक अहार न देता निकृष्ट दर्जाचे जेवन दिल्या जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या परंतु यावर कसलाच उठाव होत नसल्याने माजी सैनीक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांनी निकृष्ट जेवनाची चौकशी करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे .
माजी सैनिक संघटनेच्या वतिने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, कोरोना नियोजन संदर्भात जे अधिकारी आहेत त्यांचा ताळमेळ व एकमत नसल्यामुळे शासनाच्या नियमाचे म्हणावे तसे पालन होताना दिसत नाही.सर्व काही बंद असल्याचा देखावाच असुन चुप्प्या पध्दतीने सर्वकाही चालु आहे.कंधार कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा चांगल्या पध्दतीने मिळत आसल्याने अनेक रुग्ण कोरोना मुक्त होत आहेत. शासन कोरोना रुग्णावर करोडो रुपये खर्च करत आहेत .रुग्ण लवकर कोरोनामुक्त व्हा या साठी प्रतिकार वाढवण्यासाठी त्यांना पोष्टीक आहार देऊन लवरात लवकर रुग्ण कसा बरा होईल याकडे शासन लक्ष देत आहे.कंधार कोविड सेंटरमध्ये मात्र जेवणाचा धक्कादायक प्रकार समोर येत असुन लोकप्रतिनीधी यांच्या कार्यकर्त्याच्या शिवभोजन केंद्रातुन भोजन जात आहे. रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अंडी व दुध देण्याचा नियम असताना आज पर्यंत येथिल रुग्णाना अंडी व दुध दिले नसल्याचा प्रकार समोर येत आहे.शिवभोजन केंद्रातुन जेवन जात असल्याने पातळ तिन चपाती पातळ वरण व मुढभर भात दिला जात आहे.विशेष बाब म्हणजे हे भोजन वेळेवर दिले जात नसल्याने नागरीकांचे नातेवाईक या कोविड सेंटर मध्ये घरुनच जेवणाचा डब्बा पाठवत आहेत.शहरातील अनेक पक्षाचे नेते,पदधिकारी व कार्यकर्ते सोशल मिडीयाच्या माध्यमातुन राजकारण करत आहेत मात्र कोविड सेंटरमध्ये निकृष्ट जेवन मिळत असल्याने संबधा खातिर सर्वच गप्प बसले आहेत.
कोविड नियजना संदर्भात संबधीत अधिकारी यांच्यात एकमत नसल्याने ढिसाळ नियोजन झाले आहे .कोरोना पाॕजिटिव्ह असलेले रुग्ण हे शौकाने कोविड सेंटरमध्ये येत नसुन मनात एक धस्की घेऊन येत आहेत आहेत.परंतु येथे मात्र कोरोना बांधीताच्या नावाखाली निकृष्ट जेवन देवुन खिसा गरमषकरण्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.या संदर्भात वरिष्ट अधिकारी यांनी गांभिर्याने दखल घेऊन निकृष्ट जेवन देणाऱ्या संस्थेवर कारवाई करा आशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना माजी सैनिक बालाजी चुकलवाड यांनी दिले असुन या निवेदनाच्या प्रति तहसिलदार व वैद्यकीय आधिक्षक यांना देण्यात आल्या आहेत.