मला म्हणतात मती पण कांंही कारणास्तव वैैैैतागलेल्या अवस्थाने मती गुंगते.काय करावे समजतच नाही.
अशा परिस्थितीत अडकलेल्या माझ्या मनस्थितीत बोलके शल्य आपल्या पुढे ठेवते.
मी सर्वांच्या डोक्यात असते,
म्हणुन सर्वांचे डोके चालते।
माझे अस्तित्व तेंव्हाच कळते ,
स्मरण शक्तितून प्रकटहोते।
सर्वांनाच त्याचे प्रत्यंतर येते॥
एखाद्या वेळी बोलणे सोसावे लागते.डोक्यात शेण आहे का मेंदु? मती गुंगली का?असे हिणवले जाते. तेंव्हा मात्र वाईट वाटते.एखाद्या वेळी माझा उदो-उदो होतो.अपघातात मला इजा झाल्यास मला मृत व्हावे लागते.त्या वेळेस माझे ऑर्गन मित्र त्वचा,फुफुस, ह्रदय,किडनी,डोळे अशी मित्र इतरांच्या कामी येतात पण माझे प्रत्यारोपण होवू शकत नाही.हे माझे दुःख आहे.मला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहिन्यात रक्त थांबल्यास किंवा फुटल्यास पक्षघात होतो.मी लहान व मोठा अकारात असतो.मझा आवडता मेनु ज्ञान आहे.म्हणून आळशी व्यक्ती मला पोसून ठेवतो.त्यामुळेच माझ्यावर क्षरण चढते.माझी बाल्यावस्था अन् वृध्दावस्था ही सारखीच असते.अमिर व गरीब असा भेद माझ्याकडे नसतो.जो माझा वापर उत्तम प्रकारे करतो,त्यांच्याकडे माझे अस्तित्व टिकून राहते.अन्यथा मला खोक्यात असल्यागत वाटते.माझ्या कार्यक्षमतेवर बुध्दीजीवी उपाधी लागते.मी सर्व सजीवात असतो.पण फक्त मानवाला बुध्दीजीवी मानल्या जाते.माझा उपयोग करतो.तोच माझे आरोग्य सांभाळतो.पण इतरांना मी फक्त डोकेदु:खी ठरतो?सरकारी नोकरीत नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होतांना माझ्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह येतो.
‘
पण या कोरोना महासंकटात अख्ख विश्व परेशान होत असतांना मी गुंगी चढली….मला तर वाटते क्षरण नक्कीच चढण्याची भीती वाटते.माझ्यामुळे राजकिय नेते मंडळी, शासन,प्रशासन,भेदरलेल्या आवस्थेत असल्याने मला तर कांहीच कळेनासे झाले.माझ्यावर ज्या ठिकाणी देशाच्या भविष्यावर संस्कार होतात.ती ज्ञानालये तर शिक्षक, विद्यार्थी यांच्या दुष्काळाने अगदी अक्षरशः ओस पडल्यागत दिसत आहेत.देशातील सर्व कार्यालय , व्यापारपेठा,कारखाने,उद्योगधंदे,हातावर पोटभरणारे बसस्थानके माणसांची आवक-जावक नसल्याने परिस्थिती बिकट बनल्याने माझी मती गुंतल्याने मी हवादिल झाले आहे.शासनाचा कडक लाॅकडाउन निर्बंध कोरोना साखळी तोडण्यासाठी आहे महत्वाची,पण सर्वांच्या डोक्यात असू सुद्धा अगदी गुंगुनच राहावे लागते.दैनंदिन समाजसेवेत व्यस्त असलेले पुढारी तर शुभ्रपांढरे कपडे घालून तयार होताच खरे पण….बाहेर लाॅकडाउनची संचारबंदी असल्याने अरश्या पासून पुन्हा बैठकीत ठाण मांडावे लागते.कार्यकर्त्यांना घरी बोलवता येत नाही की कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरता येत नाही. कार्यकर्त्यांना तर आज पर्यंत घरी कधी जास्त वेळ देवून सवय नसल्याने घरच अंगावर उठल्यागत होत आहे.मला ट्रेस झाल्याने मानसिक संतुलन बिघडले आहे.बाया बापड्यावर राग व्यक्त करतांना माझी परिस्थिती विचित्र होत आहे.शाळा बंद असल्यामुळेच शिक्षकांचे असेच हाल आहेत.दररोज दैनंदिन शाळेच्या वेळात पाच-सात तास शिकविण्यात जात होते ते आता चक्क बंद असल्याने बायका पोरात बेग जाता जात नाही.मग ह्याच्यावर राग त्याच्यावर राग असे रागराग केल्याने मला तर कंटाळा आला कधी हा कोरोना एकदाचा संपेल असे वाटते.गुरुजींची बायको दिवसातून एकदा तरी कंटाळून म्हणते “या कोरोनान बरं नाही केलं बया”माझा सुड किती दिवस घेता की हे कांही कळायला मार्ग नाही.प्रत्येकांना घरी बसुन दिवसातुन अगणत वेळेस वाटते…कोरोना मला तर झाला नाही ना?
अशा प्रश्नांनी तर मी जाम वैतागून गेले.विद्यार्थ्यांचे कांही वेगळं नाही. ते तर रिकामे असल्याने घर अंगावर उठल्यागत वाटते आहे.माझा खुराक असलेली क्रमिक पुस्तके धुळीच्या स्वाधिन झाल्याने,अन् परीक्षाच रद्द झाल्याने त्यांच्या डोक्यात मला थांबणे अगदी जिवावर येत आहे.पुर्वीच्या काळी खळ्यामध्ये मेढ्याच्या भोवताली फिरणार्या वृषभ राजानी धन्याची कणसे खाऊ नये म्हणून त्यांच्या तोंडाला मुंगसे लावले जात असे तसेच या कोरोना काळात संसर्ग होवू नये म्हणून तोंडला मास्क लावून वेळोवेळी हात साबणाने किंवा सॅनिटाईजरने स्वच्छ धुता-धुया दिवस कधी संपतो हे कुतूहल सुध्दा नाही.या मुळे सर्वजण जाम वैतागल्याने माझी मती गुंगली आहे.ज्यांच्या परिवारात कोरोनाची झळ पोहंचली त्यांच्या घरी तर मी वेडी झाल्यागत वावरते आहे.कारण रक्ताची वा मैत्रीची नाती भेटायला येत नसल्याने मला तर बेचैन जीवन जगावे लागते.त्यातच एखाद्याचा मृत्यू झाल्यास परिस्थितीचे वर्णन मला माझ्या शल्या पलिकडचे वाटते आहे.
भारताच्या मेहनती संशोधकांनी दिवसाची रात्र करुन कोव्हाक्सीन व कोविशिल्ड या दोन लसीचा शोध लाव ल्यामुळे या वर्षी दुसरी लाट येवून मृत्यूचे प्रमाण वाढले तरी या वर्षी मला थोडी उसंत मिळाल्याने थोडे फार ताण कमी झाल्यागत वाटते आहे.पण मी कोरोना वाॅरियर्स डोक्यात देखील बैचैन असते,कारण रोज जनतेस जनावरागत त्यांना लाॅकडाउन मध्ये घरी बसण्यासाठी विनंती करावी लागते.हाॅस्पिटल मध्ये डाॅक्टर आणि नर्स यांच्या डोक्यात देखील मला घुटमळल्यागत होत आहे.कारण पेशंचे नातेवाईक न येता सर्व रोग्यांची सेवा करतांना रोजच्या ताणामुळे मी जाम वैतागलो आहे. दररोज कोरोना टेस्टींग लॅब टेक्निशियन यांच्या डोक्यात माझ्या सारखी मती गुंगलेली दिसते. लाईव्ह पत्रकार असो का पिंट मिडिया का सोशल मिडिया या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्यां पत्रकाराच्या डोक्यात कोरोना विषयांच्या बातम्या लिहून लिहून माझे डोके पिकायला लागले.एव्हढे काय मक्याच्या टाळू वरील लोणी खाणारे या काळातही कांही संख्येने कमी नाहीत.यांच्या डोक्यात काम करतांना नकोसे वाटते पण ते वृत्तीने रक्तपिपासे असल्याने त्यांना त्याच्या शिवाय जमत नाही,पण त्रास नाहक मला होत असल्याने मी तर जाम वैतागलो.एकही मानव प्राणी या महाभयंकर कोरोना महासंकटात भरडला गेला आहे. विषाणु नैसर्गिक का कत्रिम या पेक्षा त्यांची झळ सर्वना
पोहंचली आहे.मला माझ्या मनाचे तुमच्या पुढे बोलक्या शल्यात सुंदर अक्षर कार्यशाळा शिवाजीनगर कंधारच्या सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी बोलके केले.यामुळेच मला हे आपल्या पर्यत माझी व्यथा पोहंचवता आली.खरच सर्वांच्या मती गुंगल्याने सध्या परिस्थिती व्दिधा मनस्थितीत आहे.ही परिस्थिती बदलणार तर नक्कीच आहे.फक्त वाट पाहिल्या शिवाय गत्यंतर नाही.एवढे मात्र खरे! जय बुध्दी,..जय मेंदु…जयक्रांति..जयहिंद! जय महाराष्ट्र!
लेखन
शल्यकार
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
9860809931