नांदेड ; प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाटेला प्रतिबंध करण्यासाठी आपलेही काही योगदान असावे या उदात्त हेतूने आईच्या तेरवीचा कार्यक्रम रद्द करून त्याऐवजी दिलीप ठाकूर यांच्यामार्फत लॉयन्सच्या डब्यामध्ये गोड जेवण देऊन
डॉ. महेश काडगावकर यांनी एक नवीन सुधारणेचा पांयडा पाडला.
रविवारी लॉयन्सच्या
डब्यामध्ये डॉ. महेश काडगावकर यांच्यातर्फे २७५ व्यक्तींना गोड जेवण तर कै.सौ.मीराबाई बाबुराव कवानकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौ.रूपाली बालाजी कवानकर यांच्याकडून ५० डबे वितरित करण्यात आले.डॉ.महेश धोंडोपंत काडगावकर कुलकर्णी यांच्या आईचे सौ सरस्वती धोंडोपंत कुलकर्णी काडगावकर यांचे अर्धांगवायूचा तीव्र झटक्याने निधन झाले होते. हे सर्व अचानक घडल्याने डॉ. महेश जे की दिल्ली येथील इंडियन ऑइल येथे उच्च पदस्थ अधिकारी आहेत. त्यांना कोरोनाची तपासणीच्या रिपोर्ट अभावी जे की हवाई मार्गाच्या प्रवासासाठी आवश्यक असल्याने आपल्या आईच्या अंतिम दर्शनासाठी ही येता आलेले नव्हते. डॉ .महेश यांच्या नांदेडच्या नातेवाईकांनी सौ सरस्वती यांचा अंत्यविधी उरकुन घेतला . या बाबीची डॉ महेश यांना आयुष्यभर मनात खंत राहीलच . स्वर्गीय सरस्वती धोंडोपंत काडगावकर यांच्या तेरविच्या कार्यक्रमाचा सर्व खर्च गरजूंना अन्नदानाची संकल्पना डॉ. महेश यांनी त्यांचे मित्र अनिरुद्ध दांडगे यांच्याकडे बोलून दाखविली यास प्रतिसाद म्हणून दांडगे यांनी डॉ. महेश यांना एडवोकेट दिलीप ठाकूर यांच्या लायन्सच्या डब्याची माहिती देऊन प्रोत्साहित केले. यानंतर लगेच डॉ महेश यांनी कोरोणाग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गोड जेवन पुरविण्यासाठी ॲड. दिलीप ठाकूर यांच्या लायन्सच्या डबास देवून एक नवीन पायंडा पाडलेला आहे.आपल्या आईच्या अंत्यविधीला , सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे येऊ न शकलेल्या पुत्राने आपल्या आईस खरी श्रद्धांजली अन्नदान करून वाहिलेली आहे.ही बाब निश्चितच कौतुकास्पद असून इतरांनीही असेच अनुकरण करावे असे सर्वसामान्य पण बोलले जात आहे.