जा.क्र. १५९/२०२१
पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड
जबरी चोरी
दिनांक ०२/०५/२०२१
विमानतळ :- दिनांक ०१.०५.२०२१ रोजी चे ०५.०० वा. चे सुमारास, नमस्कार चौक ते माळटेकडी कामठाकडे जाणारे रोडवर सामाजीक न्यायभवन समोर नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन, विना नंबरचे मोसा वर येवून मादरचोदाहो, हरामखोराहो थांबा असे म्हणुन, खंजरचा धाक दाखवुन फिर्यादीचे उजव्या हाताचे बोटातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची रुपयाची व सॅमसंग, विवो कंपनीचे असे दोन मोबाईल किंमती १०,०००/- अंगठी किंमती ३५,०००/- रुपयाचे असा एकूण ४५,०००/ रुपयाचा माल जबरीने चोरुन नेले. वगैरे फिर्यादी मुरलीधर ज्ञानेश्वर कउठकर, वय ५५ वर्षे, व्यवसाय सुतार काम, रा. गांधीनगर नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे विमानतळ गुरनं १२९/२०२१ कलम ३९२, २९४, ३४ भादंवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि जाधव, मो. क्रं. ९७६५९०२७१० हे करीत आहेत.
२) गंभीर दुखापत :
१) मुदखेड :- दिनांक २९.०४.२०२१ रोजी चे १९.०० वा. चे सुमारास, फिर्यादीचे घरासमोर मुगट ता. मुदखेड जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन, फिर्यादीस, फिर्यादीचे आई वडील व पत्नीस शिवीगाळ करुन आरोपी क्रं १ यांचे हिश्याची जमीन नावावर करुन देत का नाहीस म्हणुन आरोपी क्रं १ व २ यांनी फिर्यादीचे आई वडीलास धक्का बुक्की केली व आरोपी क्रं ३ याने फिर्यादीस थापडाबुक्याने मारहाण केली व आरोपी क्रं ४ याने बांधकामावरील गजाळीने फिर्यादीचे डोक्यात मारुन डोके फोडुन दुखापत केली व आरोपी क्रं ५ याने फिर्यादीचे हातावर मारुन डावा हात फॅक्चर केला व उजवे हातावर लाकडाने मारल्याने हाताचे अंगठयाचे हाड फॅक्चर झाले व फिर्यादीचे पत्नीला आरोपी क्रं ६ व ७ यांनी डोक्याचे केस धरुन लाथाबुक्याने मारहाण केली व लाकडाने डोक्यात मारुन डोके फोडुन गंभीर दुःखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी बालाजी तुळशीराम हातागळे, वय ३४ वर्षे, व्यवसाय शेती, रा. मुगट ता. मुदखेड जि. नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे मुदखेड गुरनं ७९/२०२१ कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ भादंवि कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ/२७२१ शिंदे, मो.क्र. ९५५२५९६५८३ हे करीत आहेत.
२) बारड :- दिनांक ३०.०४.२०२१ रोजी चे ११.३० वा. चे सुमारास फिर्यादीचे घरासमोर रोडवर पाटनुर ता. अर्घापुर जि.
नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन, मागील भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीचे हाताच्या बोटाजवळ, पायावर,
खांदयावर व तोंडावर मारहाण करुन दुःखापत केली. बगैरे फिर्यादी संजय गोपाळराव घॉडगे, रा. पाटनुर ता. अर्धापुर जि. नांदेड
यांचे फिर्यादीवरुन पोस्टे बारड गुरनं ४८/ २०२१ कलम ३२४, ३४ भादंवि कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास
पोहेकॉ/ २२१७ राठोड, मो.क्र. ९८२२१७९८७७ हे करीत आहेत.
३) लोहा :- दिनांक ३०.०४.२०२१ रोजी चे १४.३० वा. चे सुमारास, फिर्यादीचे घरासमोर आंबेडकर नगर लोहा ता. लोहा जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीतांनी संगणमत करुन, फिर्यादीस जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी क्रं १ याने लोखंडी गजाळीने फिर्यादीचे डोक्यात मारुन डोके फोडुन दुखापत केली व आरोपी क्रं ३ याने दगडाने फिर्यादीच्या पाठीत मारहाण करुन मुक्का मार दिला व आरोपी क्रं २ व ४ यांनी मिळुण लाकडी काठीने फिर्यादीच्या छातीत व उजव्या हाताच्या मनगटीवर मारहाण करुन दुखापत केली व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी राठोडसिंग नवनिहालसिंग खिची, वय ४० वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आंबेडकर नगर लोहा ता. लोहा जि. नांदेड यांचे फिर्यादीवरुन पोस्टे लोहा गुरनं ७० / २०२१ कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंवि कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ ९७५४ सुर्यवंशी, मो.क्र. ९९२१५६१७५४ हे करीत आहेत.
एनडीपीएस अॅक्ट : ३)
कंधार :- दिनांक ३०.०४.२०२१ रोजी चे २०.३५ वा. चे सुमारास मौ. गुंटुर शिवारातील आरोपीचे शेतात ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या, आपले शेत गट क्रं २६६ मध्ये गांज्याच्या झाडाची लागवड करुन एकुण ८ झाडे ओलसर हिरवी पाने फांदया मुळासह वजन २३.१८६ कि. ग्रॅ किंमती १,१५,९३०/-रुपयाचा अंमली पदार्थाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपीचे शेतात लागवड केलेला मिळुन आला. वगैरे वरुन फिर्यादी पोउपनि/ सचिन सुधाकर सोनवणे, ने. स्थागुशा यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कंधार गुरन १२१/२०२१ कलम २० (१)(ब) एनडीपीए कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि श्री जाधव, मो.क्र. ८९९९८८१९०० हे करीत आहेत.
४) अपघात:
१) भोकर:- दिनांक २७.०४.२०२१ रोजी चे ०७.३० वा. चे सुमारास, भोकर ते नांदेड जाणारे रोडवर सिताखंडी भोकर ता. भोकर जि. नांदेड येथे, यातील मयत नामे शे. सदाम हुशेन शे. असरुफ, वय २८ वर्षे, रा. कन्याशाळा जवळ देशमुख गल्ली भोकर ता. भोकर जि. नांदेड हा त्याचा अॅटो क्रं एम एच २६ टी-९२१६ अॅटोचे कागदपत्र नांदेहुन घेवुन येण्यासाठी जात असताना भोकर ते नांदेड रोडवर सिताखंडी घाटात अॅटो गेला असता, त्याचे अॅटोस पाठीमागुन एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडीचे चालकाने आपले ताब्यातील वाहन हयगय व निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहण चालवुन जोराची धडक देवून गंभीर जखमी करुन मयताचे मरणास नमुद आरोपी हा कारणीभुत झाला आहे. वगैरे वरुन फिर्यादी शे. आसरफ शे. खाजामीया, वय ५८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. कन्याशाळा जवळ देशमुख गल्ली भोकर ता. भोकर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरन १५७/२०२१ (अ), २७९, ३३७, ३३८ भादवि सह कलम १३४, १७७ मोवाका कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास कलम ३०४ मपोउपनि/ सौ. भोंडवे मॅडम, मो.नं. ७७५७०८९४८१ हे करीत आहेत.
२) धर्माबाद :- दिनांक २१.१२.२०२० रोजीचे ११.३० ते दिनांक २६.१२.२०२१ चे १८.३० वा. दरम्यान, जे जे रुग्णालय मुंबई येथे, यातील मयत नामे विजय किशन राठोड, वय ३९ वर्षे, हिरडगाव तांडा ता. उमरी जि. नांदेड हा त्याची मोसा क्रं एम एच २६ एएल-७४०७ वर बसुन त्याचे सासरवाडी कल्याणी तांडा मंडळ तानुर तेलंगाणा येथे जात असताना, नमुद आरोपीने त्याचे ताब्यातील मोसा हयगय व निष्काळजीपणाने भरधाव वेगात मोसा चालवुन फिर्यादीचे भावाचे मोसा ला जोराची धडक दिल्यामुळे मयताचे डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे शरीक केले असता, उपचारा दरम्यान मरण पावला व सदर आरोपी हा मयताचे मरणास कारणीभूत झाला आहे. वगैरे वरुन फिर्यादी राजेश किशनराव राठोड, वय २९ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. हिरडगाव तांडा ता. उमरी जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे उमरी गुरन १२१/२०२१ कलम ३०४ (अ), २७९ भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि श्री कत्ते, मो.नं. ९३५६४०५४३५ हे करीत आहेत.
५) पाण्यात बुडुन मृत्यु :
भोकर:- दिनांक ३०.०४.२०२१ रोजी चे १४.३० ते १५.०० वा. चे दरम्यान, मौ. नारवट गुडा महादेव मंदिराचे जवळील तलावात ता. भोकर जि. नांदेड येथे, यातील मयत नामे ओमकार रमेश बरकंबे, वय १५ वर्षे, रा. रमामाता नगर भोकर ता. भोकर जि. नांदेड हा त्याचे मित्रासोबत नारवट गुडा महादेव मंदिराचे जवळील तलावात पाण्यात पोहण्यासाठी गेला असता, त्याला पोहता येत नसल्याने तो तलावात बुडुन मरण पावला. वगैरे खबर देणार विशाल नंदे बरकंबे, वय ३२ वर्षे, व्यवसाय शेती, रा. रमामाता नगर भोकर ता. भोकर जि. नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोस्टे भोकर आ.म. २० / २०२१ कलम १७४ सिआरपीसी प्रमाणे आ. मृ. दाखल असुन तपास पोहेकॉ ६९ जाधव, मो.क्र. ९४२१७६९९६९ हे करीत आहेत.
जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड