लोहा ; शैलेश ढेंबरे
लोहा ,कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी मतदारसंघातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, जिल्हाधिकारी व पाटबंधारे दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लिंबोटी धरणातील आरक्षित पाण्यातील पाणी पाळी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती, आमदार शिंदे यांच्या सततच्या प्रयत्नाला यश आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी लिंबोटी धरणातून 2 दलघमी पाणी लाभ क्षेत्रात सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्रकान्वये कळविले आहे.
लिंबोटी धरणातून याअगोदर रब्बी हंगामासाठी 3 पाणी पाळी सोडण्यात आल्या होत्या व सध्या उन्हाळ्यात 2 पाणी पाळी लाभ क्षेत्रात सोडण्यात आल्या आहेत , उन्हाळ्यातील त्रि व संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता आमदार शामसुंदर शिंदे यांनी 6 वी पाणी पाळी सोडण्याच्या मागणीला यश आले असून या पाणी पाळीमुळे लोहा तालुक्यातील निळा, शेलगाव, पिंपळगाव, रायवाडी, मलकापूर, हाडोळी, दगड सांगवी, पोखर भोशी, मजरे सांगवी, डोंगरगाव, लिंबोटी ,आंबे सांगवी व पोखरी अशा 14 गावांना लाभ होणार असून कंधार तालुक्यातील नवघर वाडी ,घोडज, जांभुळवाडी, आनंदवाडी ,उंमरज, बोरी, बाळांत वाडी, गंगनबीड, बाभूळगाव अशा 9 गावांना या पाणी पाळीचा चा लाभ होणार आहे, लिंबोटी धरणातून हे पाणी कालवे व नाल्याद्वारे आज सोडण्यात येणार असून या पाणी पाळ्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील गुरेढोरे व नागरिकांना या पाण्याचा त्रिव उन्हाळ्यात मोठा लाभ होणार आहे, लिंबोटी धरनातील लाभक्षेत्रातील 23 गावांतील पाणीटंचाई या पाणी पाळीमुळे पाणीटंचाई काही अंशी दूर होणार असल्याने मतदारसंघातील या 23 गावकर यातून आमदार शामसुंदर शिंदे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत .