संघर्षमय प्रवासातील सारथी ;मन्याड खो-यातील कोहीनुर डॉ.भगवानराव जाधव

सन१९८९ ला सुगाव या गावी माझ्या बहीणीकडे राहुन ५ किमि अंतरावर कहाळा येथे दहावीच शिक्षण घ्यायला गेलो . संत बाळगीर महाराज विद्यालयात प्रवेश घेतला आणि शाळा सुरू झाली . वर्गातील सगळे माझ्यासाठी नवीन असल्यामुळे सुरूवातीला आंदाज घेऊन बोलत असे . महिन्यात कोण कसा प्रत्येकाची ओळख पटली. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यात शांत , सयमी कमीतकमी बोलणं वर्गात हुशार असा विद्यार्थी म्हणजे भगवान जाधव माझ्या भाऊजींनी एके दिवशी गावाच्या बाहेर असलेल्या गोदामाच्या एका खोलीवर घेऊन गेले .

जिथे भगवान अभ्यास करायचा आमच्या दोघांची भेट घालून माझ्या बद्दल काहीतरी सांगितले आणि काही कमीजास्त पुस्तक गाईड अभ्यास पाहून घ्या म्हणाले . त्या दिवशी आमची मैत्री झाली ते आजपर्यंत …. आम्ही चौघजन मी बाळू, निळकंठ , धोंडीबा अन् भगवान त्या खोलीत अभ्यासाला होतो .आमची इंग्रजी जेमतेम होती भगवान खोलीत भिंतीवर व्याकरणाचे तक्ते लावी त्याचे पाठांतर केल्यामुळे अनेकदा मुसळे गुरुजींचा मार चुकयचा तो आम्हाला नेहमी सांगत अभ्यास करा सेंटर लई कडक आहे .

पुढे दहावीत त्याने चांगले गुण घेऊन पुढील शिक्षण नांदेडला घेतलं तिथेही प्रावीण्य मिळवून पुढील मेडिकल शिक्षणाचा प्रवास चालू झाला .घरची परिस्थिती साधारण असली तरी शिक्षणात त्याची जाणीव ठेवून एमबीबीएस प्रसुती व स्त्रीरोगतज्ज्ञ झाल्यावर काही काळ प्रशासकीय आरोग्य सेवा केली . दहावी नंतर मध्यंतरी दहावर्षे आमची भेट नव्हती तसा मोबाईलचा काळ ही नव्हता .मी कंधारला फोटो स्टुडिओ भवानी नगरमध्ये टाकला वृतपत्राच कामही करत होतो. एके दिवशी डॉ . भगवान जाधव दिसले अचानक आमची भेट अनेक दिवसानंतर गळाभेट झाली.

माझ्या दुकानाच्या वर हॉस्पीटल टाकणार असल्याच सांगितल्यावर खूप आनंद झाला. आरोग्य सेवेला सुरुवात केली. कंधार सारख्या ठिकाणी प्रसूतीचे व त्याबद्दलच्या आरोग्य सेवा देणार हॉस्पीटल खेड्यापाड्यातील लोकांना थेट नांदेडला जाग्यापेक्षा येथे सुविधा मिळू लागली. पुढे स्वतःचे अद्यावत हास्पीटलचे स्वप्न साकारले ते कायमचे या परिसराशी नाळ जोडणारे ……..
डॉक्टर जाधव यांचा जीवन प्रवास संघर्षमय झाला.

शेतकरी कुंटूबआईवडिल व वडिलभाऊ यांच्या कष्टाच चीज झाल . डॉ. अर्चना वहिनींची खंबीरपणे साथ आहे .शांत स्वभाव असलेलेअनेक मित्र परिवारात वावरतांना शिक्षण, निसर्ग आणि सामाजिक कार्यासाठी नेहमी पुढाकार असतो. .कधी कधी आमच्या गप्पा चालतांना कुणाला मदत केली अप्रत्येक्ष केलेल्या कामाला प्रशिद्धी नको असही बोलून दाखवतात . अनेक वेळा मार्गदर्शन घेतो . आरोग्य व मुलीच्या शिक्षणासाठी हिंमत दिली. आज माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्य| मित्राचा
जन्मदिवस
डॉक्टर साहेब आपणास जन्मदिवसाच्या अनंत सदिच्छा ….
आपल्याला दिर्घ आयूष्य मिळो हिच प्रार्थना……


सदा वडजे…

इंद्रधनु नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *