कंधार ; प्रतिनिधी
कोरोना काळात आर्थिक डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांची पेरणी काळात बि बियाने खते खरेदीसाठी पिळवणूक नको यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना बांधावरच बि बियाने व खते उपलब्ध करुन देण्याची विनंती राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अंगद केंद्रे यांनी दि.११ मे रोजी केली आहे.
कोराणाच्या या आपत्ती काळामध्ये शेतकरी हा चहुबाजुने भरडला आहे. त्यातच पुन्हा आता जुन महिन्यात त्यांना पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. कोरोणामुळे शेतक-यांचे अर्थीक कंबरडे मोडले असल्यामुळे शेतकरी पुर्णःतहा हवालदील झाला आहे. पेरणीसाठी खते, बि-बियाणे घेत असताना कृषि सेवा केंद्राकडुन शेतक-यांची लुट आणि खतांची साठेबाजी यामुळे शेतक-यांना खूप मोठया आर्थीक संकटाना आणि मनस्तापाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून महोदय शेतक-यांना या संकटातून वाचविण्यासाठी आपण जर शासन स्थरावर थेट बांधावर खते, बि-बियाणे पुरविण्याचा शासन निर्णय घेतला गेला तर शेतक-याची होणारी लुट आणि पिळदणुक थांबेल व कृषि सेवा केंद्रावर होणारी गर्दी कमी होईल पर्यायाणे कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
तरी आपण खरीप हंगाम/पेरणी जवळ आली असल्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय घेवून शासन अद्यादेश काढावा अशी मागणी दि.११ मे रोजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे तहसिल दार कंधार कार्यालया मार्फत राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश सचिव तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अंगद केंद्रे यांनी केली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महंमद तनवरोद्दीन,ओबीसी तालुकाध्यक्ष अच्युत मेटकर,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष विशाल गायकवाड आदीच्या स्वाक्षरी आहेत.