कंधार ; प्रतिनिधी
कंधार हे ऐतिहासिक शहर आहे. तसेच तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.या शहरांमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम रफाई , दुसरे सुपी संत हजरत सय्यद शेख आली सांगडे सुलतान मुशकिले असे 2 दर्गाह आहेत, संत साधू महाराज मठ संस्थान आहे. आठव्या शतकातील ऐतिहासिक जगतुंग तलाव, राष्ट्रकूट कालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे.तसेच कंधार घोडज रोडवर शिवेवरील गणपती आहे. व अनेक हिंदु, बौद्ध, जैन मंदिर आहेत. या धार्मिक पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी हजारो भाविक व पर्यटक आपल्या नांदेड जिल्ह्यातून, पर जिल्ह्यातून आणि इतर राज्यातून येत असतात. परंतु कंधार शहरात कुठेही दिशा दर्शक फलके नसल्यामुळे भाविकांची, पर्यटकांची, व वाहन चालकांची मोठी हेळसांड होत आहे.
त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने कंधार शहरातील बसस्थानक, महाराणा प्रताप चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आधी ठिकाणी दिशादर्शक फलके लावावेत. अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिका-यांना सामाजिक कार्यक्रते परशुराम केंद्रे यांनी केली आहे.