आदरणीय योगगुरु निळकंठ मोरे सर आपल्या योगवर्गाला प्रथम मी हार्दिक शुभेच्छा देते.कारण एवढा आरोग्यदायी जीवनाचा महामंत्र तुम्ही हाती घेतला आहे सर.या आपल्या योगवर्गाला आम्ही नियमित उपस्थित आहोत,अनुलोम विलोम व भस्त्रिका या प्राणायामामुळे मला खूप फायदा झाला आहे.
सर,यामुळे मला जी दहा ते बारा वर्षापासून सर्दीचा खूपच त्रास होता व एक नाक पूर्णत: बंदच होते,एक महिन्याच्या योगवर्गामुळे नाक उघडले व नाकाला पंख्याची हवा सुद्धा लागू देत नव्हते नाकात मुंग्या येऊन लगेच शिंका दहा बारा यायच्या,तेही बंद झाले.व मी आता पंखा चार वर ठेवला तरी मला काहीच होत नाही,तुमचे आमच्यावर खूप खूप उपकार आहेत सर.तसेच मला वाताचा खूपच त्रास आहे,तोही कमी झाल्यासारखा वाटत आहे,तोही मी नियमित उपस्थित राहून कमी करणार आहे.
तुम्ही जे सत्कार्य करत आहात सर ही तर ईश्वरसेवा आहे,आणि संकटावर मात कशी करावी हे आपल्या योग व प्राणायामामुळे तुम्ही शिकवले सर. तुमची योगा करताना प्रत्येक वेळी सांगण्याची जी धडपड,तळमळ पाहून ती खरंच जीवनाचा महामंत्र काहीतरी सांगून जाते,मला पांडागळे सरांनी प्रेरणा दिली व आम्ही दोघं पण रोज योगा करतो सर.खरंच याचा फायदा सर्वांनाच आहे.मी पण तीन जणांना योगा करण्यास तयार केले सर.
माझी बहिण रोज अहमदपूरहून लाईव्ह असते. तिचे मोहिनी बोंडगे हे नांव आहे.मोरे सरांचे खूप खूप आभार तसेच पांडागळे सरांचेही आभार.
सौ.सुकेशनी चंद्रकांतराव फुलवळकर [ योगसाधक ]
🙏🌹