राज्य सरकारने दिलेले एस ई बी सी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण घटनाबाह्य आहे असे नमूद करून रद्द केले. गेल्या तीस वर्षापासून युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण द्या, जे घटनेमध्ये टिकनारे असेल ही सातत्याने मागणी केली. कारण घटनेमध्ये फक्त तीन कॅटेगिरी मधून दिलेलेच आरक्षण टिकते म्हणून ओबीसीचे आरक्षण वाढवून मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी केलेली आहे. तीच मागणी यापुढे समाजाने सरकारवर दबाव टाकून पदरात पाडून घ्यावी व ओबीसींमध्ये मराठ्यांचा सरसकट समावेश करावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष शिवश्री नितीन पाटील कोकाटे यांनी केली आहे. ओबीसी तुन आरक्षण दिले तर आर्थिक दुर्बल मराठा समाजाला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि ते कायद्यामध्ये पण टिकेल गेल्या काही वर्षाचा मराठा आरक्षणाचा कार्यकाळ पाहिला तर अनेक पक्ष आणि नेत्यांनी स्वयंघोषित समन्वयक तयार केले आणि मराठा आरक्षणाचा बाजार मांडला व मराठा आरक्षणाची मूळ मागणी कायद्याला धरून संभाजी ब्रिगेडने केली त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. कायद्यात न टिकणारे आरक्षण पूर्वीच्या राज्य सरकारने ईएसबीसी च्या माध्यमातून दिले जे हायकोर्टामध्ये टिकले नाही. त्यानंतर सरकार बदललं फडणवीस सरकारने त्याचे नाव बदलून एस ई बी सी असे करून ते आरक्षण दिले. पण ते आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टात टिकले नाही. आज ते आरक्षण रद्द झालं आणि समाजाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या माध्यमातून झाले आहे. गेल्या तीस वर्षात मराठा समाजाने जवळजवळ ४२ समाजबांधव आरक्षणासाठी गमावले आहेत. लाखो करोडो रुपयांच आर्थिक नुकसान मराठ्यांच झालं आहे. हजारो मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले हे मराठ्यांचं नुकसान कधीही भरून निघणार नाही.
अशा परिस्थितीत कायद्यात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची थट्टा मांडण्याचं काम या ठिकाणी भाजपा, शिवसेना ,राष्ट्रवादी ,व काँग्रेस या पक्ष्याच्या सरकाराने केले आहे. संभाजी ब्रिगेडचे मराठा समाजाला विनंती आहे की यापुढे सरकारवर दबाव टाकून मराठा समाजाचा सरसगट ओबीसींमध्ये समावेश करून ओबीसी चा कोटा वाढवून आरक्षण देण्यात यावे. ही मागणी रास्त असून यामध्ये समाजाचा फायदाच होणार आहे. यापुढील लढाई संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीने मराठा आरक्षण हे ओबीसी तुन घेण्यासाठी पुढाकाराने पुढे येण्याचे ठरवत आहे.
संभाजी ब्रिगेडचे कंधार तालुकाध्यक्ष
शिवश्री नितीन पाटील कोकाटे