नांदेड ; प्रतिनिधी
सेवा ही संघटन या उपक्रमांतर्गत भाजपा महानगर नांदेडच्या वतीने लस घेणारा नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, मिनरल वॉटर व बिस्किटे वाटप करण्याला ६० दिवस पूर्ण झाले असून साठाव्या दिवशी भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांच्यातर्फे दिलीप ठाकूर,मनोज जाधव यांनी
साहित्य वितरित केले.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रविण मसाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या दररोज एका पदाधिकाऱ्यातर्फे मास्क, सॅनिटायझर, मिनरल वॉटर व बिस्किटे वाटप करण्यात येते. लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे तसेच लस घेतल्यानंतर निरीक्षणासाठी थांबावे लागत असल्यामुळे बिस्किट व पाण्याची बॉटल भाजपातर्फे मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. लस घेतली म्हणजे कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्याची आवश्यकता नाही असा गैरसमज दूर करण्यासाठी संयोजक दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून मास्क व सॅनिटायझर देण्यात येते. कोरोनाची लस सुरक्षित असल्याबाबत भाजपा तर्फे जनजागृती करण्यात येते. लस देताना कर्मचाऱ्यांकडून भेदभाव होऊ नये यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून दक्षता घेण्यात येते. दररोज साहित्य वाटप करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या समवेत अरुणकुमार काबरा, प्रशांत पळसकर, सुरेश शर्मा, संतोष ओझा, धीरज स्वामी,अमोल कुल्थिया,राजेशसिंह ठाकूर हे सेवा कार्यात सहभागी असतात. लसीकरण संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहील अशी ग्वाही संयोजक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.