नांदेड ;प्रतिनिधी
दहशतवादापासून आज जगातील कोणताही देश सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न कोणत्याही एका देशाचा नसून, या दहशतवादाने सर्व जगात आपली पावलं पसरलेली आहेत. त्यामुळे जागतिक शांतताच धोक्यात आलेली आहे. २१ मे या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. हाच दिवस दहशतवादविरोधी दिवस म्हणून संपूर्ण देशात पाळला जातो.
यानिमित्ताने संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी व अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचवावा, तसेच देशासाठी दहशतवादाविरोधात लढणार्या हजारो सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करणे, भावी पिढीला मुलग्रामी प्रभावापासून वाचविणे, त्यांच्या मनामध्ये देशाच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी जागरुकता निर्माण करणे, हादेखील या दिवसाचा उद्देश आहे.
दहशतवाद आणि हिंसाचाराचा मुकाबला करण्याच्या शपथेचे सामूहिक वाचन, मा. श्री. आ.ब.कुंभारगावे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत, कोविड १९ च्या अनुषंगाने शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करून, दिनांक २१ मे २०२१ रोजी. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त सामूहिक प्रतिज्ञा वाचन करण्यात आले..!
याप्रसंगी,
मा.श्री. आ. ब. कुंभारगावे, बि.एम. शिरगिरे, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, विनोद पाचंगे, मोशिन शेख, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे आदी उपस्थित होते..!