नांदेड दि. 20 :- नांदेड येथील एमआयडीसी परिसरातील मिश्र खत उत्पादक कारखान्यांची तपासणी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या निर्देशानुसार नुकतीच करण्यात आली. ही तपासणी कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकामार्फत करण्यात आली. यावेळी मिश्र खत कारखान्यातील उत्पादन व उपलब्ध साठा तसेच गुणवत्तेसाठी नमुने घेण्यात आले. यापुढेही अशाच प्रकारची अचानक पाहणी करुन खताची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.
या कारवाईत उपविभागीय दंडाधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार किरण आंबेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नांदेड तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी सामान्य तंत्र अधिकारी व महसूल विभागातील नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांचा समावेश होता.