कंधार प्रतिनिधी.
कंधार तालुक्यातील बारुळ सज्जाचे तलाठी यांनी मयत वारस तीन बहीणीच्या नावे असलेली मालमत्ता एकाच बहीणीच्या नावे करुन अजब कारभार केला आहे.तात्काळ या बाबत चौकशी करुन तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी न्याय मिळवून द्यावा अन्यथा तहसिल कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दि १८ मे रोजी सुमनबाई पि रंगोजी मेथे व कलावतीबाई पि.रंगोजी मेथे यांनी दिला आहे.
कंधार तालुक्यातील बारूळ सज्जा चा अजब कारभार समोर आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुमनबाई पि रंगोजी मेथे ( माहेरकडील नाव ) रा. बारुळ.ता.कंधार.जि.नांदेड.२ ] कलावतीबाई पि.रंगोजी मेथे ( माहेरकडील नाव ) रा.बारुळ.ता.कंधार.जि.नादेड असून या दोघी सख्ख्या बहिणी आहेत त्यांचे मयत वडील कै.रंगोजी सखाराम मेथे यांचे नावे मोजे बारूळ तालुका कंधार शिवारात शेत जमीन सर्वे नंबर ५९ क्षेत्र २ हेक्टर १३ आर वडिलोपार्जति शेत जमीन आहे. त्यांचे वडिलांचे मृत्यूपश्चात या दोन बहिणी तसेच मोठी बहीण चंदरबाई पि रंगोजी मेथे असेच सख्ख्या तीन बहिणीच मयत रंगोजी यांचे कायदेशीर वारस आहेत.
सदरील मयत रंगोजी मेथे यांचे नावे असलेल्या वरील वर्णनाचे शेतजमिनीचे सातबार्यावर या अगोदर इतर अधिकारांमध्ये त्यांच्या वारसदार तिन्ही बहिणीचे नावे सामाविष्ट होती.
परंतु मौजे बारूळ तालुका कंधार येथील शेततळ्याचे तलाठी यांनी मयत रंगोजी मेथे यांचे मृत्यू नंतर मोठी बहीण चंदर बाई हिचे सांगण्यावरून व तिच्याकडून पैसे घेऊन दोन बहिणीच्या माघारी व त्यांची संमती न घेता गैर कायदेशीर मार्गाने हेअर करून वरील वर्णनाचे वडीलपार्जित जमिनीचे सातबारा वरून दोन वारसदार बहिणीची म्हणजेच सुमनबाई व कलावतीबाई यांची नावे काढून टाकून त्या ठिकाणी फक्त मोठी बहीण चंद्रभागा हिचे एकटीचेच नाव ठेवले आहे सदरील बाब ही गंभीर स्वरूपाची व बेकायदेशीर बाब आहे ज्यामुळे मयत वडीलाचे नावे असलेल्या वडीलपार्जित जमिनीवरून बेकायदेशीर वारस असलेल्या दोन बहिणीचा हक्क हिरावून घेण्यात आला आहे.
तात्काळ कारवाई न झाल्यास येत्या १५ दिवसात त्यांनी तहसील कार्यालय कंधार समोर आत्मदहनाचा इशारा देखील सदरील निवेदनात दिला आहे.