नायगाव शहराजवळील बेटक बिलोली येथील काळ्याबाजारात विक्री प्रकरण
नांदेड प्रतिनिधी ;
नायगाव तालुक्यातील गर्भवती माता व अंगणवाडी बालकांना बाल विकास प्रकल्प योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका मार्फत वाटप केल्या जाणाऱ्या पोषक आहाराच्या पाचशे पिशव्या रिकाम्या नायगाव जवळील बेटक बिलोली येथील मोठ्या नाल्यात सापडल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ग्रामीण भागातील गर्भवती माता आणि बालकांना चांगल्या प्रकारे पोषक आहार मिळावा यासाठी राज्य शासनाने प्रत्येक गावातील अंगणवाडी मार्फत गावातील गर्भवती माता आणि बालकांना पोषक आहार दिला जातो पण हा पोषक आहार गावातील व वाडी तांडा वरील गर्भवती मातांना आणि बालका पर्यंत पोहोचत नाही या अंगणवाडीच्या पोषक आहाराची काळ्याबाजारात विक्री केली जात आहे अशाच प्रकारे काळ्याबाजारात गर्भवती व अंगणवाडी बालकांचा पोषक आहार काळ्याबाजारात विक्री करून पुरावा नष्ट करण्यासाठी सदर इतर पोषक आहाराच्या रिकामे या पिशव्या नायगाव जवळील बैठक बिलोली येथील नाल्यात फेकून देण्यात आल्या ज्यामुळे नायगाव व परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
तरी या गंभीर प्रकरणी बालविकास प्रकल्प अधिकारी व महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद नांदेड श्री राजुरे यांची चौकशी करण्यात यावी तसेच यामध्ये इतर जे कोणी संबंधित दोषी असतील त्यांची देखील चौकशी करण्यात यावी त्याचप्रमाणे आत्तापर्यंत नायगाव तालुक्यातील अंगणवाडी मार्फत पोषक आहाराचे वाटप केल्या जात नाही अशा अंगणवाडीची देखील चौकशी करण्यात यावी व दोषी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांचे चौकशीचे आदेश असताना देखील या गंभीर प्रकरणी दोषींना पाठिशी घालण्याच्या हेतूने मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद नांदेड हे याप्रकरणी अद्याप कसल्याच प्रकारची चौकशी व कारवाई करत नाही तरी त्यांची देखील या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होऊन चौकशी अति दोषी विरुद्ध देखील योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद नांदेड समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना दिनांक १७.०५.२०२१ रोजी देण्यात आले आहे.
तसेच सदरील निवेदनाच्या प्रती मा शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मा जिल्हाधिकारी नांदेड पोलीस अधीक्षक नांदेड यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष यांची स्वाक्षरी आहे