रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा – मराठा महासंग्राम संघटनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन

नांदेड प्रतिनिधी. केंद्र सरकारने नुकतीच रासायनिक खताचे दीडपट भाव वाढ करुन शेतकऱ्याच्या आर्थिक बजेटच ढासळून टाकल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यात दोन वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्यात तोंडावर येऊन बसलेल्या हंगामी पेरणी साठी लागणारे रासायनिक खते केंद्र सरकारने दीडपट भाव वाढ करून शेतकऱ्यांना कोरोना भेट दिली का ? असा संतप्त सवाल शेतकरी वर्ग बोलून दाखवत आहे.

एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांना म्हणतो की आम्ही तुमच्या मालाला दुप्पट भाव देऊ पण दुप्पट भाव देणे ऐवजी शेतकऱ्यांना लागणारे रासायनिक खताचे भाव मात्र दुप्पट करून ठेवले आहेत मग केंद्र सरकार शेतकऱ्याचे की रासायनिक खते तयार करणाऱ्या कंपनी दाराचे ? हे कोडे सामान्य जनतेला पडले आहे त्यातच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्र सरकार करत आहे त्यामुळे हा रासायनिक खताचे भाववाढीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा १२०० रुपयाचे एक खताचे पोते १९०० रुपयांना मिळत आहे हेच का अच्छे दिन ? रासायनिक खतामध्ये २०:२०:०:१२:३२:१६:१०:२६:२६: व डि.ए.पी. या खताच्या किमतीत दीडपट वाढ झाली आहे केंद्र सरकारने नुकतेच रासायनिक खताचे दीडपट भाव वाढ करून शेतकऱ्याचा आर्थिक बजेट ढासळून टाकल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यात दोन वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्यात तोंडावर येऊन बसलेल्या हंगामी पेरणी साठी लागणारे रासायनिक खते केंद्र सरकारने दीडपट भाव वाढून शेतकऱ्यांना करुणा भेट दिली का ? असा संतप्त सवाल शेतकरी बोलून दाखवत आहेत एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांना म्हणते की आम्ही दुप्पट भाव देव पण दुप्पट भाव देण्याऐवजी शेतकऱ्यांना लागणारे रासायनिक खताचे भाव मात्र दुप्पट करून ठेवले आहे मग केंद्र सरकार शेतकऱ्यांचे की रासायनिक खते तयार करणाऱ्या कंपनी दाराचे ? हे कोडे सामान्य जनतेला व माझ्या बळीराजा ना पडले आहेत त्यातच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्र सरकार करत आहे.

त्यामुळे हा रासायनिक खताचे भाववाढीचा निर्णय तात्काळ केंद्र सरकारने मागे घेण्यात यावा. रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती आठ दिवसाच्या आत केंद्र सरकारने कमी कराव्यात अन्यथा शेतकऱ्यास समवेत रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांच्या पाठीशी रासायनिक खताच्या किमती कमी होईपर्यंत मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने आंदोलन चालूच राहणार याची गंभीर नोंद घ्यावी या आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे .

सदरील निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर मराठवाडा अध्यक्ष प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख नांदेड तिरुपती पाटील भागानगरे ,जिल्हा सल्लागार नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण ,तालुका अध्यक्ष नायगाव संभाजी पाटील पवळे ,तालुका अध्यक्ष कंधार शिवाजी पाटील शिंदे ,तालुका उपाध्यक्ष नायगाव बाळू पाटील ,तालुका सचिव कंधार परमेश्वर पाटील भागानगरे ,कार्याध्यक्ष कंधार यांच्या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *