डॉ.सविता व डॉ. यशवंत चव्हाण या दाम्पत्या कडून लॉयन्सच्या उपक्रमात शंभर डब्बेचे योगदान

नांदेड ; प्रतिनिधी

पहिला मुलगा आयएएस झाल्यानंतर मुलीने देखील पहिल्याच प्रयत्नात एमडी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चव्हाण दाम्पत्यांनी लॉयन्सच्या डब्यामध्ये शंभर जणांना मिष्ठान्न भोजन देऊन साजरा केला.

डॉ. सविता व डॉ. यशवंत चव्हाण या दाम्पत्याचा मोठा मुलगा डॉ.सुयश हा तीन वर्षांपूर्वी आय ए एस परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या जर्मन वकालतीत सेवा बजावीत आहे. त्यांची मुलगी कु. स्नेहल यशवंतराव चव्हाण हिने नुकतीच फार्माकोलॉजी मध्ये एमडीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन चव्हाण परीवाराचा आनंद द्विगुणीत केला आहे. कोरोना प्रतिबंध सुरू असल्यामुळे डॉक्टर चव्हाण यांनी दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधून गरजूंना अन्नदान करण्याचे सूचना दिल्या. त्यानुसार शनिवारी रेल्वे स्टेशन परिसरातील परप्रांतीय मजुर प्रवाशांना डॉ. चव्हाण यांच्या हस्ते भोजनाचे डबे देण्यात आले. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात लॉयन्स च्या डब्यामध्ये योगदान देणार्‍यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.श्लोक यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. सचिन सिंघल यांच्यातर्फे, आशा व राजेश गवारे यांच्या लग्नाच्या वाढदिवस, सौ.मीरा व प्रा. विलास शिवाजीराव कुलकर्णी यांच्या लग्नाच्या एकविसाव्या वाढदिवस,कै.माणिकराव विष्णुपुरीकर ह्यांच्या पुण्यतिथी निमित्त दीपक व सुधीर विष्णुपुरीकर यांच्यातर्फे,ॲड.ओमप्रकाश शंकरराव कामीनवार,रीना सुधीर खोरिया यांच्यातर्फे प्रत्येकी शंभर डबे वितरित करण्यात आले.

तसेच संध्या व अनंत हंडे यांच्या लग्नाचा वाढदिवस,साै नंदा व जगदीश कुलकर्णी यांच्या विवाह वर्धापनदिन,सौ. माधवी व डॉ. मुरलीधरराव फुलारी यांच्या लग्नाचा पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त माधवराव माटे यांच्यातर्फे,गोविंद देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नीता देशमुख यांच्या तर्फे,
विहान अमित अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त,
सौ.ललितादेवी मुरलीधरजी मालपाणी यांच्यातर्फे,कै.सरस्वती रामराव देशमुख यांच्या स्मरणार्थ नीता नवनाथराव देशमुख यांच्यातर्फे प्रत्येकी पन्नास डबे वितरित करण्यात आले.

याशिवाय आशिष दिवाकरराव मुखेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिवाकर अनंतराव कुलकर्णी मुखेडकर यांच्या तर्फे १७० डबे तर
योगेश यदुनाथ कोटगिरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री यदुनाथ कोडगिरे यांच्यातर्फे सत्तर डबे,
मरशिवणे हरिहर लक्ष्मणराव यांच्या तर्फे सत्तर डबे,संध्या कळसकर नांदेड यांच्या वतीने पंचाव्वन डबे गरजूंना वितरित करण्यात आले. डबे वितरित करण्यासाठी संयोजक दिलीप ठाकूर यांच्या समवेत अध्यक्ष संजय अग्रवाल, अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, कामाजी सरोदे ,प्रशांत पळसकर,संतोष ओझा,मन्मथ स्वामी, राजेशसिंह ठाकूर, विशाल धुतमल हे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *