कंधार ;
बियाण्याची बीज प्रक्रिया करताना बियाण्यास रासायनिक बुरशीनाशके, कीटकनाशके यासोबत जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ,द्विदल पिकांना जैविक खते रायझोबियम तर एकदल पिकांना अझॅटोबॅक्टर यासह पीएसबी (फोस्फोरस सोल्युबलायझिंग बॅक्टरिया, स्फुरद विरघळवणारे जिवाणू), केएसबी (पोटाश सोल्युबलायझिंग बॅक्टरिया , पालाश विरघळविणारे जिवाणू ) ,एसएसबी (सल्फर सोल्युबलायझिंग बॅक्टरिया, गंधक विरघळवणारे जिवाणू ), (झिंक सोल्यूबलायझिंग बॅक्टेरिया, जस्त विरघळवणारे जिवाणू) या व अशा जिवाणूंची बीजप्रक्रिया केल्यास जमिनीतील सूक्ष्म मूलद्रव्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढते व त्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होते. पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य मॉलिब्डेनम, कॉपर, बोरॉन या अन्नद्रव्यांची उपलब्धता बीजप्रक्रियेच्या माध्यमातून केल्यास उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे दिसून आले आहे यासाठी चिलेटेड ग्रेड II या सूक्ष्मघटक असलेल्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी.
बाजारात झेलोरा , विटावॅक्स यासह विविध कंपन्यांची उत्पादने रासायनिक बीजप्रक्रियेसाठी उपलब्ध आहेत.
बीजप्रक्रियेचे फायदे :-
बीजप्रक्रिया केल्यावर त्यांपासून वाढीव दर्जेदार उत्पन्न अवश्य मिळते. ही लागवडीपूर्व करावयाची एक सोपी पण परिणामकारक प्रक्रिया आहे. पर्यावरणपुर्वक आहे ,कमी प्रमाणात लागते व कमी खर्च लागतो,यामुळे पिक वाढीच्या नंतरच्या कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखे येते. बीजप्रक्रिया केल्यामुळे बियांपासून व जमीनीतील उद्भवणारे रोगाविरूद्ध पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व अपायकारक जीवाणूंसून पिकाचे संरक्षण होते.
बिजप्रक्रिया करण्याचा क्रम:-
1) सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी त्यानंतर कीटकनाशकची त्यानंतर 3-4 तासांनी रायझोबिअम ॲझॅटोबॅक्टरची बिजप्रक्रिया करावी सर्वात शेवटी पी. एस.बी. ची बिजप्रक्रिया करावी.
रमेश देशमुख ,तालुका कृषी अधिकारी ,कंधार