कंधार/प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून कंधार तालुक्यामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी संस्थेची स्थापना केली.
आज ज्या पद्धतीने सामान्य माणसाला कोणीही मदत करायला कोणी तयार नाही येणाऱ्या काळामध्ये ह्या युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामान्य गोरगरीब लोकांच्या सुख दुःखामध्ये धावून जाऊन मदत करण्याच्या उद्देशाने सर्व कळका मंगनाळी बोरी कळकवाडी नावंद्याचीवाडी ह्या पंचक्रोशीतील तरुणांनी एका ठिकाणी येऊन युवा क्रांती बहुउद्देशीय संस्था स्थापन केलेली आहे.
आणि येणाऱ्या काळामध्ये संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठी या संस्थेची उभारणी करण्यात आलेली आहे आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील कोकाटे उपाध्यक्षपदी संजय अभंगे कार्याध्यक्षपदी चंद्रकांत डुकरे सचिवपदी शिवाजी कागदेवाड व या संस्थेच्या कार्यामध्ये उभारणीसाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलेला आहे असे संस्थेचे मार्गदर्शक शिवानंद डुकरे शंकर अभंगे शिवराज डुकरे अविनाश टोम्पे साई गंगोत्री अरुण गायकवाड या सर्व तरुणांनी पुढाकारातून युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केलेली आहे अशी माहिती संस्थेच्या सर्व सदस्यांनी दिली.