महाराष्ट्रातील साऱ्या संतांनी आपापली कामे करून भक्ती भावनेची जपणूक केली. त्याविषयी राष्ट्रसंत म्हणतात, ‘तुझे काम तू इमानदारीने कर हा तुझा धर्म, ही संतांची धर्म व्याख्या आहे. ही व्याख्या त्यांनी नुसतीच सांगितली नाही, तर आपल्या जीवनाने, आचरणाने त्यांनी ती सिद्ध करून दाखवली..!
संत सावता महाराज हे माळी होते. त्यांनी रात्रंदिवस टाळ कुटले नाहीत. सालोसल गेले नाहीत. तर ते आपल्या मळ्यात काम करीत राहिले. भाजी पिकवत राहिले. बाजारात नेऊन विकित राहिले. कोणीतरी विचारले
” सावता महाराज, पंढरीला चला.”
तर त्यांनी उत्तर दिले,
”कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
राष्ट्रसंतांची भाषणे संपादक- अशोक राणा अधिव्याख्याता, महिला महाविद्यालय, अमरावती लिखित हा ग्रंथ दिनांक २२ मे २०२१ रोजी. चि. गजानन दशरथ बैलके आणि चि. सौ. का. रुपाली धोंडिबा घोणशेटवाड यांच्या विवाहप्रसंगी वधू-वरास राष्ट्रसंतांची भाषणे हा ग्रंथ भेट देऊन पुढील सुखमय जीवन वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
यावेळी,
मा. मुरलीधर दरेगावकर ( ग्रामसेवक ) , मा. कोंडीबा बैलके ( सहशिक्षक ), मा. हनुमंत बैलके, मा. विजय घोणसेटवाड, मा. रामेश्वर घोणसेटवाड, मा. विठ्ठल पवार, मा. मनोज देवाले, मा. विलास वाघमारे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✒️- सोनू दरेगावकर, नांदेड..!
➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖