आदरणीय श्री नीळकंठ रावजी मोरे कंधारकर यांना माझा हृदयातून सस्नेह सप्रेम नमस्कार, आपण आम्हा योग साधकास एवढ्या विस्तृतपणे, सहज सोप्या भाषेतून कळेल अशा गोड वाणीतून दररोज नियमित पहाटे चार वाजता उठून योग साधनेच्या तयारी सह तत्पर राहुन योगाचे वर्ग चालवत आहात. आपल्या या परिश्रमाला आणि या विचाराला माझा सलाम..!
आपण योग वर्ग घेत असताना बेंबीच्या देटापासून एवढ्या पोटतिडकीने सांगत आहात. हे जर आम्हा साधकांना कळत नसेल तर त्याला उपयोग नाही. याची जाणीव सर्व योग साधकांनी अविस्मरणीय ठेवली पाहिजे. भेट दिलेल्या वस्तू विसरून जातात. पण जन्मोजन्मी आयुष्य उपयोगी योग्य रुपी ज्ञान हे कदापि विसरू शकत नाही. आपली तळमळ आणि आपला खटाटोप पाहून मला आश्चर्य वाटते आणि आनंदही वाटतो आहे. कारण या सध्याच्या काळात कुणी कुणाला वेळ द्यायला तयार नाही. आपण स्वतःला योग साधनेमध्ये वाहून घेतलेले आहे.
अशा या कोरोनाच्या महामारीच्या काळात भयभीत झालेल्या जनता जनार्दन च्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून योगसाधनेचा रूपाने दृकश्राव्य पद्धतीने योगाचे धडे देत आहात. यामुळे भयभीत झालेल्या माणसांमध्ये नव चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. आमच्यामध्ये आत्मविश्वास वाढला आहे. या कोरोनाच्या काळात आमच्या जीवनात नवीन पालवी फुटल्यासारखे वाटते आहे. आपल्याविषयी खूप काही लिहिण्यासारखे आहे. आम्ही यापूर्वी नियमितपणे योग करीत आहोत. पण या सर्व जनसमुदाय सोबत योग करीत असतानाचा आनंद वेगळाच आहे. या आनंदामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये कितीतरी पटीने ऊर्जा वाढते. ऊर्जा वाढल्यामुळे आत्मविश्वास वाढतो.
सर आपण हे पुण्याचे काम हाती घेतलात, या विश्वातील सकल जनांना जगण्यासाठी योग साधनेद्वारे आधार दिलात. म्हणून मी आपला खूप खूप आभारी आहे.
आपलाच योगसाधक
[ विलास पाटील वळंकीकर, नांदेड ]
मो.नं.9403206730