घोडज ता.कंधार येथिल बालाजी शिवाजी लाडेकर यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड

कंधार तालुक्यातील छोट्याशा घोडज गावातील अत्यंत हलाकीच्या परिस्थितीला मात करून त्यांचे मोठे बंधू माधव लाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यांने मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यामध्ये CDS मार्फत ऑल इंडिया मध्ये 40 व्या रँकमध्ये त्याची झालेली निवड ही नक्कीच गौरवास्पद आहे. या निवडी बद्दल माजी सैनिक संघटना नांदेड चे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड व माजी सैनिक संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

  CDS परीक्षा खूप अवघड असते,माझ्याने होत नाही, मला जमत नाही, आपल्या जागाच भरत नाहीत, इंटरव्ह्यू अवघड असतो इ. प्रकारचे कारणे सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना यातून खूप काही शिकन्यासारख आहे.

या स्पर्धेच्या युगात एवढया मोठ्या पदावर तुमची झालेली निवड ही आपल्या परिसरातील तयारी करणाऱ्या मुलांना नक्कीच प्रेरणादायी असेल, योग्य नियोजन, आत्मविश्वास, सातत्य हा या निवडीचा मूलमंत्र असेल.

आपला यथोचित सन्मान झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा मुलगा एवढ्या मोठया पदावर जाऊ शकतो .तुमच्या गावचीच नाही तर संबध तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव तुम्ही मोठे केलात.

खरच खूप अभिमान वाटतो तुमचा.

आपल्या परिसरातील आणखी हजारो जवान देशसेवेसाठी सैन्यात दाखल झालेले आहेत अन आणखीही यापुढे होत राहतील यात शंकाच नाही.

साहेब तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. जय हिंद

माजी सैनिक संघटना नांदेड


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *