झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात 10 हजार करोड रुपयांहून अधिक भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी नाही झाल्यास आत्मदहन निश्चित

मुंबई दि ( प्रतिनिधी) झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात 10 हजार करोड रुपयांहून अधिक भ्रष्टाचार झाला असून याची सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत मार्फत चौकशी व्हावी यासाठी आमरण उपोषणाने प्रश्न नाही सुटल्यास आत्मदहन निश्चित असल्याची माहिती डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.

या प्रकल्पात मूळ झोपडीधारक अपात्र ठरवून आजही काहींना भाडे धनादेश किंवा सदनिकेचा ताबा दिलेला नाही मात्र: विकासक विमल शाह याची पत्नी नातलग व स्टाफला पात्र कसे करण्यात आले? तत्कालीन एमआयडीसी संबंधित अधिकारी यांची वंशावळ संपत्ती च चौकशी व्हावी व विमल शहा वर त्वरित कार्यवाही होऊन जेरबंद होणे गरजेचे आहे.

अनेक्स हॉटेल कुण्या अटी शर्थी वर बांधण्यात येऊन शासनाचे सर्व नियम धाब्यावर मारून प्रकल्पाची जागा व्यवसाया साठी वापरण्यास कुणी आणि कशी परवानगी दिली यासाठी महादलाल मुरजी पटेल, विकासक विमल शहा व तत्कालीन एमआयडीसी समबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी होऊन जेरबंद करावे व हॉटेल चा परवाना रद्द करून ती जमीन प्रकल्पाच्या ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मुलांच्या खेळाच्या मैदानाची तरतूद असलेल्या जागेवर आकृती सेंटर पॉईंट ही इमारत कशी व कोणाच्या परवानगीने बांधण्यात आली याची चौकशी होऊन ही इमारत जमीनदोस्त करून विकासक विमल शहा तत्कालीन एमआयडीसी संबंधित आदीकऱ्यांवर कारवाई होऊन जेरबंद करणे अत्यंतगर्जेचे आहे.

प्रकल्प पूर्ण न होता विक्री च्या इमारतीला विकासकाला कोणत्या अधिकाऱ्याने ओसी देऊन प्रकल्प मुक्त केले याचा तपास होऊन संबंधित अधिकार्यास तात्काळ सेवेतून हद्दपार करावे त्याची संपत्ती सील करावी व विकासकासह तत्कालीन अधकार्याला जेरबंद करावे.

तात्पुरत्या स्वरूपात एमआयडीसी सी कडून विकासक विमल शहा ने जागा मागबुन घेऊन आद्यपही परत ना केल्या
प्रकरणी त्या जागेवर अवैद्य निर्माण करून शासनाच्या प्रकल्पात चोरी करणाऱ्या या महाठगास व सर्व माहिती असूनही कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे महत्वाचे आहे.

सदर प्रकरणात खोट्या जातीच्या दाखल्यावर निवडून येऊन मतदार समाज निवडणूक आयोग व शासनाची फसवणूक करणाऱ्या मा न्यायालयाने दोषी ठरविलेल्या ४२० महादलालाचा हात असून विकासकाचा मास्टर माईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, २०/२५ वर्षाखाली उष्टी बिडी मागून पिणाऱ्या आता आमदार पदाचे डोहाळे लागलेल्या मुरजी कांजी पटेल ची वंशावळ संपत्ती ची चौकशी होऊन त्याचे सर्व खाते व संपत्ती सील करण्यात यावी या व अश्या असंख्य प्रश्नांची उकल करण्यासाठी आमरण उपोषण करत असून प्रश्न मार्गी नाही लागल्यास आत्मदहन करणार असल्याची निश्चिती विद्रोही पत्रकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *