लोहा ; प्रतिनिधी
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी (नांदेड जिल्हा) टेळकी चे सरपंच संदीप हिरामनराव देशमुख यांची निवड करण्यात आली.
संदीप देशमुख यांच्या निवडीचे पत्र सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व सरचिटणीस विकास जाधव यांनी देशमुख यांना दिले आहे.
परिषदेच्या ध्येय धोरणानुसार नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सर्वांगीण ग्राम विकासाबद्दल असणाऱ्या विविध न सुटणाऱ्या अडचणी सरकार दरबारी किंवा वेळप्रसंगी कोर्टात मांडून त्या सर्वोत्परिने सोडविण्याचा प्रयत्न करणार तसेच सरपंचांच्या न्याय हक्का साठी सुद्धा ह्या माध्यमातून आवाज उठवण्याच काम करण्याचे प्रतिपादन संदीप देशमुख ह्यांनी ह्यावेळी दिले
या निवडीबद्दल प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते- पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव, राज्य महिला अध्यक्षा राणी पाटील, प्रदेश कोअर कमिटीचे प्रमुख अविनाश आव्हाड, राज्य महिला उपाध्यक्षा अश्विनी थोरात, सुप्रिया जेथे यांनी या अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत
सरपंच परिषद ही ग्रामविकासाच्या तसेच सरपंचाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारी आक्रमक परिषद म्हणून राज्यात नावारूपास आहे. तसेच या परिषदेच्या माध्यमातून सरपंचांच्या समस्या बरोबरच गावस्तरीय विकासात्मक कामे करण्यासाठी उद्भवणाऱ्या अडचणी बाबत अनेक निर्णय शासनास घ्यायला भाग पाडले आहे. वेळप्रसंगी न्याय हा कोर्टातून सुद्धा मिळवला आहे.
संदीप देशमुख यांनी ह्या वर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत टेळकी या गावी सर्वच्या सर्व 11 पैकी 11 सदस्य निवडून आणून प्रस्थापितांचे डीपॉजीट जप्त करून सत्तांतर केले होते. त्यांच्या टेळकी ह्या गावात समस्त ग्रामस्थ मतदारांनी अभूतपूर्व असे आशीर्वादरुपी मतदान त्यांच्या पॅनेल ला देवून पाठिंबा दिला होता, त्या न भूतो न भविष्यती दिलेल्या मतदान टक्क्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत, तालुक्यात होवून टेळकी ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी झाली होती.
तत्पूर्वी महाराष्ट्रातील नामांकित अश्या पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूट येथून MBA Financial Management चे शिक्षण घेवून देशमुख यांनी मास्टर्स पूर्ण केले होते. उच्चशिक्षित असलेले देशमुख हे हैदराबाद येथे नामांकित कंपनी मध्ये फिनान्सियल ऑडिटर म्हणून कार्यरत होते.
कॉलेज जीवनापासूनच समाजसेवेची आणि राजकारणाची रुची असल्याने नोकरी च्या सुखसमृद्ध आयुष्यात आणि मेट्रो शहराच्या आकर्षणात समाधान नव्हते त्यातच लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम करत असताना आपल्या मूळ गावाची झालेली परिस्थिती पहावली नसल्याने विकासाचा ध्यास घेवून ग्रामपंचायत लढवण्याचा आणि गावापासून समाजसेवा सुरू करण्याचा निर्धार केला आणि हैदराबाद येथील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपल्या जिल्ह्यात येऊन समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला.
या निवडीबद्दल देशमुख यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.