नांदेड – तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे २५६५ व्या बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विश्वविख्यात डॉ. सिद्धार्थ एम. जोंधळे यांचे मार्गदर्शन लाभणार असून धम्मध्वजारोहण, बुद्ध वंदना, पुजा पाठ, भोजनदान आदी कार्यक्रमही होणार आहेत अशी माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त दि. २७ मे रोजी सकाळी १०.३० वा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून मर्यादित लोकसंख्येच्या प्रमाणात कार्यक्रम साजरा होणार आहे. व्याख्यानानंतर भिक्खू संघाची धम्मदेसना पार पडेल या कार्यक्रमाला भंते संघरत्न,भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शिलानंद, भंते सुनंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुदत्त, भंते सुजात, भंते शिलभद्र, भंते सुगत या भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे. तरी इच्छुक बौद्ध उपासक उपासिका यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.