सा-या विश्वाला शांतीचा संदेश देणा-या,महामानव,सम्यक,सम्यकबुध्द,महाकारुणिक तथागत गौतम बुध्दांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला.त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुध्दोधन होते तर आईचे नाव महामाया असे होते.वैशाखी पौर्णिमेला”बुध्दजयंती “मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.सर्वगुणसंपन्न असणारे तथागत गौतम बुध्द लिपीज्ञान,धनुर्विद्या,काव्यव्याकरण,पुराण
,इतिहास,वेद,ज्योतिष इ.मध्ये तरबेज होते.
भारतीय इतिहासातील लोकशाही,स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्त्रोत म्हणजे महामानव तथागत गौतम बुध्द.बौध्द धर्मामध्ये वैशाखी पौर्णिमेला अन्यन्य साधारण असे महत्व आहे.वैशाखी पौर्णिमेला तथागत गौतम बुध्दांच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे याच दिवशी १)राजपूत्र सिध्दार्थ गौतमाचा जन्म २)राजकन्या यशोधरेचा जन्म,३)राजकुमार सिध्दार्थांचा विवाह,४)ज्ञानप्राप्ती व ५)महापरिनिर्वाण या अतिशय लक्षणीय घटनांमुळे या पौर्णिमेला अलौकिक असे महत्तव प्राप्त झाले आहे.
कल्याणाचा महामार्ग दाखविणा-या तथागत गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त होऊन चार आर्यसत्यांचे व सिध्दांताचे ज्ञान वयाच्या ३५ व्या वर्षी रात्रीच्या तिस-या प्रहरी वैशाखी पौर्णिमेला इ.स.पू.४८३मध्ये मल्ल देशातल्या कुशीनगर येथे झाले याच दिवशी शालवनात शालवृक्षाखाली तथागत गौतमाला महानिर्वाण प्राप्त झाले.एकूणच बुध्दांच्या संपूर्ण आयुष्यात वैशाखी पौर्णिमा अत्यंत महत्वाची ठरली आहे.”संयमित जीवनच मोठा यज्ञ” हा संदेश त्यांनी जनसामान्यांना दिला.तसेच तथागतांनी तत्वज्ञानाचा वर्तमानाचा विचार मांडला.पंचशील,अष्टांगमार्ग आणि दहा पारमितांवर धम्माला अधिष्ठित केले.शांती,अहिंसा,मैत्री,न्याय याची शिकवण दिली.खरे पाहाता बुध्द हे नाव नाही तर ती ज्ञानाची उपाधी आहे.बुध्द या शब्दांचा अर्थ आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी असा आर्थ होतो.आज अख्या विश्वात गौतम बुध्दांचे अनुयायी आहेत.जगभरातील मानवतावादी,विज्ञानवादी लोकांनी गौतम बुध्दांचे अनूयायीत्व पत्करलेले आहे. गैातम बुध्दांनी सर्व विश्वाला शांतीचा संदेश देत आयुष्यभर त्यांनी समता,स्वातंत्र्य,बधुंता हा उपदेश केला.अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम.
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१