नांदेड :प्रतिनिधी
इंग्लंड अमेरिकेनंतर आता धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
यांच्या कार्याची दखल घेत ओमान या अरबी राष्ट्रातून लॉयन्सच्या
डब्याला मदत मिळाली असून बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून गरजूंना आमरस पुरी देऊन सणाचा आनंद साजरा करण्यात आला .
मूळचे नांदेड चे रहिवासी भगवानराव शिंदे जोमेगावकर,अभियंता हे गेल्या नऊ वर्षापासुन ओमान येथील मस्कत शहरात नौकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. लहानपणापासून ते वर्तमानपत्रातून दिलीप ठाकूर यांचे कार्य वाचत असतात. सोशल मीडियातून ठाकूर यांच्या अन्नदान चळवळीची माहिती त्यांना मिळाली. बुध्द पौर्णिमेला गरजूंना आमरस पुरी देण्यात येणार असल्याचे समजल्यावर त्यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून दोनशे डबे वितरित करण्यासाठी सहकार्य केले. शिंदे यांच्याशिवाय विजय राधाकिशनजी मालपाणी परिवारातर्फे शंभर डबे, धनराजसिंह नरसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर डबे,गणेश कोंडावार बाबानगर यांच्या तर्फे शंभर डबे,गुप्तदान शंभर डबे, आणि कै.सुरेश सीतारामपंत खरवडकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती जयश्री सुरेश खरवडकर यांच्यातर्फे पन्नास डबे , सर्वेश व समर सुरेश खरडकर यांच्या तर्फे 50 डब्बे बुधवारी वितरित करण्यात आले.तिसरे लॉकडाऊन लागल्यानंतर सतत ४२ दिवसापासून
शंभर टक्के लोकसहभागातून डबे वितरण करण्यात येत आहेत. आमरस पुरी खऱ्या गरजूंना देण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या समवेत सुष्मिता खरवडकर सुप्रिया रितेश ठाकुर जयश्री खरवडकर अरुणकुमार काबरा, सोनू उपाध्याय, संजय अग्रवाल, प्रशांत पळसकर, सुरेश शर्मा ,राजेशसिंह ठाकूर, मन्मथ स्वामी, विशाल धुतमल यांनी परिश्रम घेतले. कित्येक वर्षानंतर आमरस पुरी खाल्ल्याचे अनेक निराधारांनी कबूल करून समाधान व्यक्त केले