.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
भगवान गौतम बुद्ध ” बुद्ध ” होण्यापूर्वी अनेक नावांनी ओळखले जायचे . त्यांच्या पूर्व जन्मा विषयी ज्या कथा सांगितल्या जातात . त्या कथांना “जातक ” कथा म्हणून ओळखले जाते या सर्व कथा बोधपर आहे . या कथा जीवन कसे जगावे या विषयी मार्गदर्शन करतात . कल्पानिक शक्ती पेक्षा सत्य व विज्ञानवादी आहेत .
भगवान गौतम बुद्धांनीLord Gautama Buddha कोणतीही मूर्ती पूजा सांगितीली नाही . ढोंगबाजीचे औडंबर माजविले नाही . समाजात अंधश्रद्धा पसरेल असे कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत व सांगितल्या ही नाहीत .
जीवनात जे घडते तेच सत्य . जे आपण पहात नाही . कुठे दिसत नाही या फालतू फडतूस गोष्टी विषयी कधीच त्यांनी प्रचार व प्रसार केला नाही . स्वतःही चमत्कारात कधीही आडकले नाही व समाजाला अडकविले नाही .
बुद्ध म्हणजे काय? बुद्ध या शब्दाचा अर्थ काय ? बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे “ज्ञानी” (the enlightened one) . आज बुद्ध जयंती या विषयी मी आपणास एक गोष्ट सांगणार आहे Lord Gautama Buddha
भगवान गौतम बुद्ध Lord Gautama Buddhaगावोगावी उपदेश करत फिरत असतानाची ही गोष्ट आहे . एका गावात एक गरिब बाई राहात होती . तिला एकूलता एक मुलगा होता . दिसायला सुंदर सालस गोड होता . वयाने लहानच होता पण गुणी होता . तो अचानक आजारी पडला व एक दोन दिवसातच मरण पावला . एकुलता एक मुलगा अचानक गेल्यामुळे त्या बाईवर दुःखाचे डोंगर कोसळले . ती रडू लागली . परमेश्वराला प्रार्थना करू लागली “माझा मुलगा परत दे ” पण मुलगा परत कसा येईल ?
गावातील कोणीतरी एका शहाण्या माणसाने सांगितले ,” बाई या आपल्या गावाजवळ महात्मा गौतम बुद्ध आलेले आहे . ते तुझ्या मुलाला वाचवू शकतात . तुझ्या मुलांना तेथे घेवून जा . ती बाई मुलाला घेवून महात्मा गौतम बुध्दांकडे घेवून गेली .Lord Gautama Buddha भगवान गौतम बुद्धासमोर मुलाला ठेवून छाती बडवत रडू लागली . मुलाच्या जीवाची भिक मागू लागली . महाराज माझ्या मुलाला वाचवा .जिवंत करा म्हणून प्रार्थना करू लागली . बुद्धांनी त्या बाईला खूप समजावून सांगितले ते तिला म्हणाले, “आई मेलेल्या जीवाला पुन्हा जिवंत करता येत नाही . तुम्ही परत जा “. पण आशा वेडी असते असे म्हणतात ती बाई महणाली , ” महाराज माझ्या मुलाला जीवंत केल्या शिवाय मी येथून हलणार नाही . माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करा”
शेवटी नाइलाजाने महात्मा गौतम बुद्ध म्हणाले , ” आई ,मी तुझ्या मुलाला जिवंत करतोय पण माझी एक अट आहे” ती मायी पटकण म्हणाली , ” महाराज तुमची अट मला मान्य आहे सांगा मी तुमची अट पूर्ण करते .” भगवान बुद्ध म्हणाले ,”आई मग तुम्ही तुमच्या गावात जा व आतापर्यंत कोणाच्याच घरी एकही जीव मेलेला नाही अशा घरुन फक्त मुठभर तांदूळ घेवून ये. मी तुझ्या मुलाला जिवंत करतो “
आई मुलाचं प्रेत भगवान बुद्धाच्या जवळ ठेवून गावात लगबगीने गेली व आक्रोश करत रडत रडत प्रत्येक घरासमोर जावून मुठभर तांदूळ मागू लागली . तांदूळ मागताना ती प्रत्येकाला विचारत होती , “तुमच्या घरी सुरवाती पासून आता पर्यंत कोणीच मेलेला नसेल तरच मला मुठभर तांदूळ द्या ” पण तिला तिच्यागावात एकही घर भेटलं नाही की ज्या घरात माणूस मेलेला नाही . ती आई शेजारच्या सर्व गावात ही मुठभर तांदूळ भेटते का म्हणून फिरून आली पण तिला मुठभर तांदूळ कोणीही दिले नाही कारण प्रत्येकांच्या घरी कोणीन कोणी मेलेले होते .
आता त्या आईला सत्य कळाले या जगात जन्माला येणारा कोणीच अमर नाही . ती परत भगवान बुद्धाजवळ Lord Gautama Buddhaयेवून सर्व प्रसंग कथन केली . या जगात कोणीही अमर नाही . हे तिला कळाले . भगवान बुद्धांनी कोणतेही चमत्कार न दाखवता त्या मातेला जगातील अंतिम सत्य पटवून दिले होते . बुद्ध जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा
राठोड मोतीराम रुपसिंग
” गोमती सावली ” काळेश्वरनगर, विष्णुपूरी, नांदेड – ६
९९२२६५२४०७