कंधार ; डॉ.माधवराव कुद्रे
येथून जवळ असलेल्या पानशेवडी जि. प. प्राथमिक शाळेत नुकतेच गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी भेट दिली होती.भेटीअंती शाळेची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना मासिक कृती पुस्तिका वाटप करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी कृती पुस्तिका तयार करुन विद्यार्थ्यांना वाटप केले.
केंद्र फुलवळ अंतर्गत कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी ही इयत्ता सातवीपर्यंत भरणारी शाळा असून या फुलवळ बीट मधील सर्वात मोठी आणि गुणवत्तापूर्ण शाळा असल्याची मत गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी दिले होते. यावेळी शाळेला प्राप्त असणारी प्रयोगशाळा अद्यावत असून फुलवळ बिटातीलल सर्व शाळांनी या प्रयोगशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निलीमा यंबल यांनी शाळेच्या प्रगतीसाठी घेतलेले परिश्रम याबाबत त्यांचे कौतुक केले होते. शाळेतील शिक्षक कैलास गरुडकर यांच्यासह इतर शिक्षक ऑनलाईन शिकवणी करत असल्याने व अन्य शिक्षक गावात जाऊन विद्यार्थ्यांची संवाद साधत असल्याने समाधान व्यक्त केले होते.
या तपासणीत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या कृती पुस्तीका तयार करण्याच्या सुचना गटशिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी दिल्या होत्या, त्यामुळे गटशिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या भेटी मध्ये दिलेल्या सूचनेनुसार शाळेतील शिक्षिका सौ. हिमटे मनिषा यांनी आपल्या चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना मासिक कृतीपुस्तिका तयार करून सर्व विद्यार्थ्यांना वाटप केल्या. त्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ.निलीमा यंबल यांनी शिक्षिका सौ.मनिषा हिमटे यांचे अभिनंदन केले.